याप्रकरणी गावात कोणताही वाद होऊ नये यासाठी पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्त करण्यात आला आहे.
परभणी । नगर सह्याद्री
उपसरपंच पदाचा राजीनामा द्यावा म्हणून उपसरपंचाच्या कुटुंबाला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उगडकीस आला आहे. उपसरपंच पदाचा राजीनामा द्या या कारणांवरून सरपंचासह इतर काही तरुणांनी उपसरपंच शशिकलाबाई कांबळे यांच्यासह कुटुंबातील व्यक्तींना मारहाण केली.
या मारहाणीमध्ये उपसरपंचाचा मुलगा निखिल कांबळे याला लोखंडी रॉडने मारल्याने तो गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी गावात कोणताही वाद होऊ नये यासाठी पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सरपंच साधना डोईफोडे, केशव डोईफोडे, पूनम डोईफोडे, महादेव डोईफोडे, कौसाबाई डोईफोडे यांच्याविरोधात उपसरपंच शशिकलाबाई कांबळे यांनी सेलू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता उपविभागीय अधिकारी सुनील ओव्हळ, पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांनी तातडीने घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा येथे बंदोबस्त केला. या पाचजणांविरोधात सेलू पोलीस ठाण्यात रविवारी मध्यरात्री विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.
COMMENTS