पत्नीने अपमानास्पद बोलल्यामुळे पतीने चिडून स्वयंपाकघरातून भरलेले गॅस सिलिंडर आणले व तिच्या डोक्यामध्ये घातले.
नागपूर । नगर सह्याद्री
घरगुती वादातून पतीने सिलेंडरने मारहाण करून व त्यानंतर तिचा गळा दाबून तिची हत्या करण्यात आली आहे. घडलेल्या सर्व प्रकारानंतर तासभर रिल्स पाहिल्यानंतर पतीने रात्र मृतदेहापाशी झोपून काडली. त्यानंतर सकाळी उठून गुन्हाची कबुली पोलीस ठाण्यात येऊन दिली.
अबरजरीन नय्यर समीर अन्सारी (३५) असे मृत पत्नीचे नाव आहे. पती समीर मोहम्मद हनिफ अन्सारी (४९) व पत्नी हुडकेश्वरच्या बहादुरा येथील घोडनी सिममध्ये टेक ऑफ गार्डन स्कीममधील ई-विंगमध्ये राहत होते. या दोघांना मूल होत नसल्याने त्यांच्यामध्ये लहानसहान गोष्टींवरून वाद होत असत.
कपडे न आणल्याच्या कारणावरून त्यांच्यामध्ये सोमवारी सायंकाळच्या दरम्यान वाद झाला. पत्नीने अपमानास्पद बोलल्यामुळे पतीने चिडून स्वयंपाकघरातून भरलेले गॅस सिलिंडर आणले व तिच्या डोक्यामध्ये घातले. मृतदेहाची हालचाल होत असल्याचे लक्षात येताच गळा दाबून मारून टाकले. त्यानंतर हातपाय धुऊन मोबाइलमध्ये रील्स पाहून झोपी गेला.
सकाळी उठून पत्नीची हत्या केल्याची माहिती वाठोडा पोलिस ठाण्यात दिली. वाठोडा पोलिस ठाण्यातून याची माहिती हुडकेश्वर पोलिस ठाण्यामध्ये दिली गेली. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक नरेश पंडित यांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
COMMENTS