पुणे शहर आता ड्रग्ज माफियांच्या हाती? असा प्रश्न उपस्थित केला आहे. कारण, पुणे पोलिसांनी एका कारवाईत ड्रग्ज माफियांच्या टोळीला अटक केली आहे.
मुंबई / नगर सह्याद्री -
पुण्यातून एक बातमी समोर आली आहे. पुण्यात गुन्हेगारी थांबण्याचे नाव घेत नाहीये. कोयता टोळीने पुण्यात खळबळ उडवून दिली आहे. या टोळीच्या दहशतीने पुण्यातील जनता हैराण झाली आहे. या टोळीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. अशा स्थितीत चिंताजनक बातमी पुणे शहराच्या निदर्शनास आली आहे.
एकीकडे पुण्यातील नागरिकांवर हल्ले, दरोडे, घरफोड्या, चोऱ्यांनी त्रस्त आहेत. पुणे शहर आता ड्रग्ज माफियांच्या हाती? असा प्रश्न उपस्थित केला आहे. कारण, पुणे पोलिसांनी एका कारवाईत ड्रग्ज माफियांच्या टोळीला अटक केली आहे.
पुणे पोलिसांनी ड्रग्ज माफियांकडून एक कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करून ३ जणांना अटक केली. सुमेर जयरामजी बिष्णोई, चावंडसिंग मानसिंग राजपूत, लोकेंद्रसिंह महेंद्रसिंग राजपूत अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून ही टोळी राजस्थानमधील असल्याचे सांगण्यात आले आहे. कात्रज परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी कात्रज कोंढवा रोडवर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी सुमेर बिष्णोईला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी ६४ लाख २८ हजार रुपये किमतीचे ३ किलो २१४ ग्रॅम अफीम जप्त करण्यात आले.
पोलिसांनी आरोपीची सखोल चौकशी केली असता त्याने सांगितले की, त्याला चावंदसिंग राजपूत आणि लोकेंद्रसिंह राजपूत यांनी अफिम दिली होती. या दोघांकडे अमली पदार्थांचा मोठा साठा असल्याचेही त्याने सांगितले.आरोपींच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पुण्यातील गोकुळनगर परिसरातून चावंडसिंग मानसिंग राजपूत, लोकेंद्रसिंह महेंद्रसिंग राजपूत यांना अटक केली. या दोघांकडून पोलिसांनी एक कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहेत. हे अमली पदार्थ नेमके कुठे विकले जाणार होते याचा तपास पोलीस करत आहेत.
COMMENTS