तसेच मनात शंका आणू नका मी कुठलीही तडजोड करणार, आपल्याला भाजप विरोधातच लढायचे आहेस, असे स्पष्ट सांगितले आहे.
मुंबई / नगर सह्याद्री -
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी दिल्लीत पक्षातील नेते तसेच पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी पदाधिकाऱ्यांना आगामी निवडणुकीसाठी पक्षाची बांधणी कराअसे आदेश पदाधिकाऱ्यांना दिल्याचे सांगण्यात येते. तसेच मनात शंका आणू नका मी कुठलीही तडजोड करणार, आपल्याला भाजप विरोधातच लढायचे आहेस, असे स्पष्ट सांगितले आहे.
अजित पवार यांनी काही आमदारांसह बंडखोरी केल्याने राष्ट्रवादीत सध्या दोन गट पडले आहेत. राष्ट्रवादीच्या बहुतांश आमदारांनी अजित पवारांना यांना पाठिंबा दिला आहे. या पाठिंब्यामुळे अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत.
दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचा गट विरोधात आहे. शरद पवार गटातील आमदारांची संख्या कमी आहे. त्यामुळे काँग्रेससाठी त्यांना विरोधी पक्षनेतेपद सोडावे लागणार आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या गटाकडून शरद पवार यांचे मन वळविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
त्यामुळे शरद पवार भाजपला पाठिंबा देणार की विरोधातच राहणार, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याचवेळी सोमवारी दिल्लीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
“मी कधीच तडजोड करणार नाही. मनात कोणीही संभ्रम ठेऊ नका. आपण भाजपबरोबर जाणार नाही. आगामी निवडणूकीच्या दृष्टीने पक्षाची बांधणी करा, आपला विचार लोकांपर्यंत घेऊन जा” असे शरद पवार यांनी पदाधिकाऱ्यांना तसेच कार्यकर्त्यांना सांगितले आहे.
दरम्यान, शरद पवार यांच्या भूमिकेबाबत विरोधक सातत्याने राजकीय संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या आठवड्यात पुण्याला आले होते. लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यात त्यावेळी शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर होते. त्यावरून विरोधकांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे.
COMMENTS