यावेळी ते बोलत होते. सरपंच चित्राताई वराळ पाटील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.
ज्येष्ठ नेते विश्वनाथ कोरडे | नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत महिला बचत गटांना स्टॉल
निघोज | नगर सह्याद्री
भाजपचे राज्य व केंद्र सरकारचे धोरण व निर्णय लोकहितकारी व सर्वसामान्य जनतेला आर्थिक पाठबळ देणारे असल्याचे प्रतिपादन भाजपाचे राज्य कार्यकारिणी सदस्य व ज्येष्ठ नेते विश्वनाथ कोरडे यांनी व्यक्त केले आहे.
निघोज येथील मंळगंगा व तेजस्विनी महिला बचत गटांना राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण उपक्रम योजने अंतर्गत स्टॉल देण्यात आले. यावेळी ते बोलत होते. सरपंच चित्राताई वराळ पाटील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.
यावेळी उपसरपंच माऊली वरखडे, पंचायत समितीचे माजी सदस्य दिनेश बाबर, ग्रामपंचायत सदस्या शबनूर इनामदार, भाजपचे उपाध्यक्ष मोहनशेठ खराडे, भाजपा ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष मनोहर राउत, अल्पसंख्याक समाजाचे नेते अस्लमभाई इनामदार, पांडुरंग उघडे, मच्छिंद्र बेलोटे, आनंद दरेकर, मळगंगा व तेजस्विनी महिला बचत गटाच्या पदाधिकारी व सदस्या सविता गायखे, सोनी पवार, संध्या गायखे, सुवर्णा गायखे, सारिका गायखे, गौरी खोबरे, प्रियंका खराडे, विठाबाई कावळे, संपदा दिवसे, ज्योती श्रीमंदीलकर, छाया श्रीमंदीलकर, सुनिता श्रीमंदीलकर, रेखा गांधी, ज्योन्सा लोढा, जयश्री शेटे, अनिता वराळ, उषा लामखडे,उषा सारंगधर आदी तसेच महिला भगीनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून शिंदे, फडणवीस, पवार हे सरकार लोकहितकारी निर्णय घेऊन शेतकरी व सर्व सामान्य जनतेसाठी चांगले निर्णय घेत आहेत. राज्याचे महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून महिला बचत गट, शासन आपल्या दारी या योजना प्रभावशाली असून जनतेला या योजनाचा फायदा मोठ्या प्रमाणात मिळत असून भाजपचे धोरण हे सर्वसामान्य व शेतकर्यांना फायदेशीर असल्याचे त्यानी सांगितले.
सरपंच चित्राताई वराळ पाटील यावेळी म्हणाल्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, धनश्रीताई विखे पाटील यांनी जिल्ह्यातील महिला बचत गटांना मार्गदर्शक ठरतील असे बचत गट प्रवरानगर, राहाता तालुका व शिर्डी परिसरात भक्कमपणे उभे केले आहेत. हजारो कुटुंबांना हक्काचा रोजगार निर्माण होईल अशा असंख्य योजना राबवीत विखे पाटील यांनी महिला बचत गटांना शासकीय योजनेतून फायदे मिळवून दिले आहेत. निघोज व परिसरातील महिला बचत गट सक्षम असुन पदाधिकारी व सदस्या चांगले काम करीत असून बचत गटांनी शासकीय योजनांचा फायदा घेउन सर्वसामान्य जनतेला आर्थिक पाठबळ मिळेल असे त्या यावेळी म्हणाल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडुरंग उघडे यांनी केले. शेवटी अल्पसंख्याक समाजाचे नेते अस्लमभाई इनामदार व ग्रामपंचायत सदस्या शबनूर इनामदार यांनी आभार मानले.
COMMENTS