निहाल बाळासाहेब काळे, बाळासाहेब निवृत्ती काळे, भारती बाळासाहेब काळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अहमदनगर । नगर सह्याद्री
ईडलवाईज ब्रोकर इंडिया लिमिटेड कंपनीमध्ये गुंतवणूक करून दरमहा पाच टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून 13 कोटी 49 लाख रुपयाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तीन जणांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगरमध्ये अशा प्रकारे अनेक नागरिकांची फसवणूक केल्याची शक्यता वर्तवली आहे. हा आकडा मोठा असण्याचा अंदाज पोलीसांनी वर्तवला आहे. निहाल बाळासाहेब काळे, बाळासाहेब निवृत्ती काळे, भारती बाळासाहेब काळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत प्रियंका शैलेंद्र सूरपुरिया यांनी फिर्याद दाखल केली आहे.
काही दिवस आरोपीने फिर्यादींना परतावा दिला परंतु त्यानंतर त्यांनी परतावा देणे बंद केले. त्यानंतर फिर्यादी व त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोपी काळे यांच्याकडे पैशाची मागणी केली. त्यावेळी आमच्याकडे पैसे नाहीत व आम्ही डबघाईला आलो आहे. त्यामुळे पैसे परत करू शकत नाही, तुम्हाला कायदेशीर कारवाई करायची असेल करू शकता असे म्हणून फसवणूक केल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जे.सी. मुजावर करत आहेत.
COMMENTS