मागील दोन दिवसापुर्वी अहमदनगर येथील मुस्लिम युवकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.
पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांना निवेदन | गुन्हेगाराला कडक शिक्षा करण्याची मागणी
सुपा | नगर सह्याद्री
अहमदनगर मध्ये एका मुस्लिम युवकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या घटनेचा सुपा येथे सर्व धर्मायांनी निषेध करत या गुन्हेगाराला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी सुपा पोलिस निरिक्षक ज्योती गडकरी यांना निवेदन देण्यात आले.
मागील दोन दिवसापुर्वी अहमदनगर येथील मुस्लिम युवकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या घटनेमुळे हिंदू समाजा सह सर्व धर्मियांमध्ये संतापाची लाट उसळली असुन या घटनेचे अहमदनगर जिल्ह्यासह राज्यभर तीव्र पडसाद उमटत आहेत. अनेक सामाजिक राजकीय संस्थानी या घटनेचा निषेध केला आहे. या घटनेतील मुख्य आरोपीला जास्तीत जास्त कडक शिक्षा व्हावी व पुन्हा असे दृषकृत्य करण्याचे धाडस कुणी करु नये यासाठी राज्यभर मोर्चे आंदोलने होत आहेत. अगोदरच या समाजाकडे संशयाने पाहिले जात असुन त्यात अशा एखाद्या माथेफिरुने असे दृषकृत्य केल्यानंतर याचे दृषपरिणाम त्या समाजातील निरपराध नागरिकांना भोगावे लागत असतात. गुरुवारी झालेल्या अहमदनगर येथील घटनेचा सुपा येथे सर्व धर्मियांच्या वतीने निषेध करण्यात आला. यावेळी सरपंच मनिषा रोकडे, युवा नेते उद्योजक योगेश रोकडे, अरुण ठोकळ, जब्बार शेख, मार्तंडराव बुचुडे सर यांनी निषेध करत आपले मनोगत व्यक्त केले.
सरपंच मनिषा रोकडे यावेळी म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराज सर्व जाती धर्मियांचे आराध्य दैवत आहे. त्यांच्या विषयी अपशब्द बोललेले आमच्याकडून कदापी खपवून घेतले जाणार नाही. महाराजां विषयी वाईट बोलणार्या प्रवृत्तीला जास्तीत जास्त कडक शिक्षा झाली पाहिजे असेही त्या यावेळी म्हणाल्या. सुपा पोलिस स्टेशनच्या पोलिस निरिक्षक ज्योती गडकरी म्हणाल्या की, सुपा शहरात सर्व जाती धर्मिय गुण्या गोविंदाने रहातात व यापुढे ही असेच ऐकोप्याने रहावे अशी सदिच्छा व्यक्त करत कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले. यावेळी हिंदू मुस्लिम समाजासह सर्व धर्मिय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS