धक्कादायक बाब म्हणजे हि तरुणी पाच महिन्यांची गर्भवती झाल्याने घटना उघड झाली. याप्रकरणी नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमरावती । नगर सह्याद्री
एका १६ वर्षीय कॉलेज तरुणीला फूस लावून तिचे लैगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हि तरुणी पाच महिन्यांची गर्भवती झाल्याने घटना उघड झाली. याप्रकरणी नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी नितीन नरसिंगकार (३२, नांदगाव पेठ) याच्याविरूद्ध बलात्कार व पॉक्सोअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन तरुणी आणि आरोपी यांचे गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. काही दिवस गेल्यानंतर तरुणीवर आरोपीने जबरदस्ती शारिरीक संबंध ठेवले. त्यानंतर तरुणीला घरी आणून सोडले. घडलेली गोष्ट घरी सांगितली तर तुझ्या आई वडिलांना मारुन टाकेन, अशी धमकी आरोपीने तरुणीला दिली.
तरुणीच्या आईने वैद्यकीय तपासणीसाठी खाजगी रुग्णालयात नेहल्यावर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर डॉक्टरांनी गर्भवती असल्याचे सांगितले. पिडितासह तिचे कुटूंब हादरल्याने बाल कल्याण मंडळासह नांदगाव पेठ व गाडगेनगर पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
COMMENTS