पुण्यातील बालगृहात असलेला एक १५ वर्षीय तरुण काही दिवसांपूर्वीच मलकापूर राेडवर असलेल्या बालगृहात दाखल करण्यात आला होता.
अकोला । नगर सह्याद्री
मलकापूर राेडवर असलेल्या बालगृहातील एका १५ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी खदान पाेलिसांनी आकस्मिक मृत्यूची नाेंद केली आहे. अहवाल आल्यानंतर या घटनेचे मूळ कारण समोर येणार असल्याचे सांगितले.
पुण्यातील बालगृहात असलेला एक १५ वर्षीय तरुण काही दिवसांपूर्वीच मलकापूर राेडवर असलेल्या बालगृहात दाखल करण्यात आला होता. या बालगृहात आल्यापासून तो इतरांपासून लांब राहून शांत राहत होता. त्याच्याशी बाेलण्याचा प्रयत्न करून देखील तो कोणाशी बोलत नसे.
या मुलाने गुरुवारी दळण काढण्यासाठी चक्कीत चाललो असल्याचे सांगून चक्कीचे दार आतून लावले व गळफास घेतला. त्यानंतर अनेकांनी दार वाजवल्यानंतर दार न उघडल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाची खदान पाेलिस अधिक तपास करत आहेत.
COMMENTS