ऑनलाईन वेबिनारचे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बुधवार २३ ऑगस्ट २०२३ स.८ ते १० या वेळेत आयोजन करण्यात आले आहे.
डॉ. अमोल बागुल ऐकवणार चंद्रावरचा आवाज
अहमदनगर | नगर सह्याद्री
अखिल जगतात भारताचा मानबिंदू ठरणार्या चांद्रयान-तीन मोहिमेच्या यशस्वीतेसाठी राबणार्या इस्त्रो शास्त्रज्ञ व मोहिमेवर काम करणार्या भारतीयांना शुभेच्छांमुळे प्रोत्साहन मिळणार आहे. प्रयोगशील संशोधक शिक्षक डॉ.अमोल बागुल यांच्या जाहिरातमुक्त बागुगल वेबसाईटच्या वतीने आयोजितचांद्रयान-तीन यशस्वीभवया ऑनलाईन वेबिनारचे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बुधवार २३ ऑगस्ट २०२३ स.८ ते १० या वेळेत आयोजन करण्यात आले आहे.
अमोल बागुल या फेसबुक पेजवर संपन्न होणार्या या वेबीनारमध्ये इस्रोच्या ८ अवकाशयानांच्या प्रतिकृतींची प्रात्यक्षिके, चंद्रावरच्या आवाजाची प्रस्तुती, चांद्रयान-तीनचे लाईव्ह लोकेशन, लँडिंगची विशेष माहिती, इस्त्रोची कामगिरी आदि महत्त्वपूर्ण माहिती व प्रात्यक्षिके डॉ.बागुल सादर करणार आहेत. चांद्रयान-तीन तुम आगे बढो.. भारत तुम्हारे साथ है या घोषवायसह डॉ.बागूल यांनी या उपक्रमाचे आयोजन केले असून जास्तीत जास्त खगोलप्रेमी, शिक्षक, पालक, विद्यार्थी यांनी या वेबिनारचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. प्रस्तावित चांद्रयान-तीन याच दिवशी बुधवार दि.२३ ऑगस्ट रोजी सायं.५ ते ६ च्या सुमारास चंद्रावर उतरण्याचे सुतोवाच इस्त्रोने केले आहे.
COMMENTS