बंगळुरु / नगर सह्याद्री Vikram Lander : सध्या चांद्रयान-३ याचीच चर्चा अन उत्सुकता भारतीयांमध्ये दिसत आहे. यानामधील प्रज्ञान रोव्हरची चंद्रा...
बंगळुरु / नगर सह्याद्री
Vikram Lander : सध्या चांद्रयान-३ याचीच चर्चा अन उत्सुकता भारतीयांमध्ये दिसत आहे. यानामधील प्रज्ञान रोव्हरची चंद्रावर भ्रमंती सुरु आहे. या माध्यमातून विविध माहिती घेण्याचे काम सध्या सुरु आहे.
दरम्यान विक्रम लँडरने चंद्रावर पहिला शोध लावण्यात यश मिळवलं आहे. लँडरने सर्वप्रथम चंद्राच्या पुष्ठभागावरील तापमानाची माहिती मिळवली. शोधातून खास माहिती मिळाली आहे. चंद्राचा पुष्ठभाग आणि जमिनीच्या 8 सेमी आत तापमानात 0 ते 40 डिग्री सेल्सियसचा फरक आहे.
आता हे नेमकं कस हे आपण भारताच्या दुष्टीकोनातून समजावून घेऊ. गर्मीच्या सीजनमध्ये राजस्थानच अधिकतम तापमान आणि काश्मीरमधील सरासरी तापमान यामध्ये 40 डिग्री सेल्सियसचा फरक असतो. या दोन प्रदेशात 1 हजार किलोमीटरच अंतर आहे. चंद्राच्या पुष्ठभागावर आणि 8 सेंटीमीटर आत तापमानातील हा फरक दिसून येतो.
हमाईट क्रेटर सर्वात थंड
चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलं आहे. तिथे कमीतकमी तापमान -238 डिग्री सेल्सियसपर्यंत आहे. चंद्रावर 14 दिवस सूर्यप्रकाश आणि 14 दिवस रात्र असते. चंद्रावरचा एक दिवस म्हणजे पृथ्वीरचे 14 दिवस असतात. चंद्रावर जो रिसर्च झालाय, त्यानुसार चंद्रावर हमाईट क्रेटर तळ सर्वाधिक थंड आहे.
नासाने इथल तापमान -250 डिग्री असल्याच सांगितलं. चांद्रयान-3 मधील विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांना चंद्रावरील तापमानाच्या दृष्टीने डिझाईन केलं आहे. ही उपकरण सूर्यप्रकाशात काम करु शकतात. मात्र तापमान -238 डिग्री झाल्यानंतर ती काम करु शकणार नाहीत. त्या वातावरणात विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर काम करण्यास सक्षम नाहीत.
COMMENTS