चांद्रयान-३ कडून नवीन संशोधन जे समोर येईल ते जगाला मार्गदर्शक असणार आहे. दरम्यान आता ISRO ने एक खुशखबर दिली आहे.
नवी दिल्ली / नगर सह्याद्री
ISRO ने केलेल्या यशस्वी कामाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. चांद्रयान-३ कडून नवीन संशोधन जे समोर येईल ते जगाला मार्गदर्शक असणार आहे. दरम्यान आता ISRO ने एक खुशखबर दिली आहे.
चांद्रयान ३ वरील प्रज्ञान रोवरनं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ऑक्सिजन शोध लावला आहे. यासह चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सल्फर, ऍल्युमिनिअम, कॅल्शियम, लोह, क्रोमियम, टाइटैनियम, मँगनीज, सिलिकॉन असल्याची माहिती रोवर कडून ISRO ला मिळाली असल्याची माहिती मिळाली आहे.
ही माहिती ISRO ने ट्विटरवरुन दिली आहे. इस्त्रोनं या संदर्भात सोशल मीडियावर माहिती देताना सांगितलं की वैज्ञानिक प्रयोग सुरु आहेत. रोवर लावलेल्या लेजर संचलित ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोपनं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील भागात गंधक असल्याची पुष्टी केली आहे.
आता सध्या रोवर हायड्रोजनचा शोध घेत आहे. इस्त्रोच्या विक्रम लँडरवरील चास्ते या उपकरणानं काही दिवसांपूर्वी चंद्रावरील तापमानासंदर्भात माहिती पाठवली होती. जर, चंद्रावर हायड्रोजन आढळून आला तर पाणी असल्याबद्दलच्या गृहितकाच्या जवळ जाता येऊ शकते.
COMMENTS