व्यापारी विलीन कमलाकर बिराजदार जवळ गेल्यानंतर त्यांना लाथाबुक्क्यांनी व काठीने महान करण्यात आली.
लातूर । नगर सह्याद्री
शहरातील एका व्यापाऱ्याला तुमचे राहिलेले पैसे तुम्हाला परत करतो असे म्हणून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. व्यापाऱ्याला मारहाण करुन, त्याच्याच खिशातील २० हजाराची राेकड आणि मनगटी घड्याळ काढून घेतले. घडलेला प्रकार लातूरमध्ये मंगळवारच्या दरम्यान घडला.
याप्रकरणी एमआयडीसी पाेलिस ठाण्यात दाेघांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विलीन कमलाकर बिराजदार (रा. लातूर) या व्यापाऱ्याला दोघांनी फोन करून, तुमचे राहिलेले पैसे द्यायचे आहेत, लवकर ये म्हणून त्याला बाेधी चाैकात बाेलावून घेतले.
व्यापारी विलीन कमलाकर बिराजदार जवळ गेल्यानंतर त्यांना लाथाबुक्क्यांनी व काठीने महान करण्यात आली. तसेच त्यांच्या खिशामधील त्याला जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी एमआयडीसी पाेलिस ठाण्यात दाेघांविराेधात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
COMMENTS