कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीची हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच येथे १७ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली.
मुंबई / नगर सह्याद्री -
कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीची हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच येथे १७ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली. ही हृदयद्रावक घटना कल्याण पूर्वेतील खडेगोळवली परिसरात घडली.
समीर लोखंडे (वय १७) असे ठार झालेल्या मुलाचे नाव आहे. कल्याण पूर्वेतील खडेगोळवली परिसरात ही घटना घडली. १० ते १२ जणांच्या टोळक्याने मुलाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत मुलाचा मृत्यू झाला. कोळसेवाडी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत काही संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.
काल, शुक्रवारी पूर्वेकडील १० ते १२ जणांच्या टोळक्याने एका १७ वर्षीय मुलाला बेदम मारहाण केली. किरकोळ कारणावरून टोळक्याने या मुलाचा जीव घेतल्याचे बोलले जात आहे. कोळसेवाडी पोलिसांनी काही संशयित मारेकऱ्यांना ताब्यात घेतले असून, वृत्त मिळेपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
कल्याणमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला होता. एका तरुणावर कोयत्याने हल्ला झाल्याची घटनाही घडली होती. दोनच दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीची हत्या झाली होती. त्यामुळे परिसरात कल्याण आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवली आहे. उपाययोजना सुरू केल्या आहेत. तरीही गुन्हेगारी थांबण्याचे नाव घेत नाही.
COMMENTS