26 डिसेंबर 2022 रोजीही तिने बाबा महाकालच्या भस्म आरतीमध्ये सहभाग नोंदवला होता.
मुंबई । नगर सह्याद्री
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा हे त्याच्या विवाह सोहळ्यामुळे चर्चेत आहेत. परिणीती - राघव यांच्या लग्नाची धामधूम तयारी सुरु आहे. नुकतेच हे दोघेजण उज्जेनला पोहचून त्यांनी महाकालचे दर्शन घेतले आहे. दोघांनी भगवान महाकालचे आशीर्वाद घेत मंदिराच्या नंदी हॉलमध्ये पुजा पार पाडली. यावेळी दोघांनी मंदिराच्या नियमाचे पालन करत राघवने धोतर तर परिणीतीने साडी नेसली होती. या जोडप्याने तिथे शांतीपाठ पूजा केली.
मंदिराचे पुजारी पंडित यश गुरू यावेळी म्हणाले की, परिणीती चोप्रा ही बाबा महाकालची भक्त आहे. 26 डिसेंबर 2022 रोजीही तिने बाबा महाकालच्या भस्म आरतीमध्ये सहभाग नोंदवला होता. लग्नापूर्वी परिणीती आणि तिचा होणार पती राघव हे दोघे देखील महाकालचा आशीर्वाद घेण्यासाठी उज्जैनला आली होती. परिणीती आणि राघव चढ्ढाने नंदी हॉलमध्ये श्री सूक्त पठण करून बाबा महाकालची पूजा केली.
सध्या दोघांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. परिणीती आणि राघव चढ्ढाने 13 मे रोजी दिल्लीत एंगेजमेंट केली होती. या सोहळ्यावेळी फक्त त्यांचे जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य होते. हे दोघेही पुढच्या महिन्यात 25 सप्टेंबरला लग्न बंधनात अडकणार आहेत.
लग्नानंतर हे जोडपे गुरुग्राममध्ये रिसेप्शन देणार असल्याचे म्हटले जात आहे. परिणीती-राघव उदयपूरच्या ओबेरॉय उदयविलास 5 स्टार हॉटेलमध्ये लग्न करणार असून लग्नाच्या दहा दिवसांपूर्वी जंगी सेलिब्रेशनला सुरुवात होणार आहे. त्यामुळे देवाची पूजा करत त्याच्या लग्न सोहळ्याची गाठ बांधली आहे.
COMMENTS