प्रकरण मिटवावे लागेल, असे सांगून तिने त्याच्याकडे पुन्हा पाच लाख रुपयांची मागणी केली.
पुणे । नगर सह्याद्री
हॉटेल व्यावसायिकाला मैत्रीच्या जाळ्यात ओढून एक लाख ८० हजार रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हॉटेल व्यावसायिकाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. आरोपी महिला हॉटेल व्यावसायिकाच्या मित्राची पत्नी असून आर्थिक व्यवहारांमुळे दोघांमध्ये मैत्रीसंबंध निर्माण झाले होते.
काही कालावधी उलटल्यानंतर महिलेने हॉटेल व्यावसायिकाला प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न केला परंतु हॉटेल व्यावसायिकाने प्रतिसाद न दिल्याने महिलेने शरीर शरीरसंबंध ठेवण्यासाठी धमकावले. त्यानंतर त्यांनी नकार दिल्यामुळे बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करेल अशी धमकी देण्यात आली. घाबरलेल्या हॉटेल व्यावसायिकाने त्यावेळी पुन्हा तिला एक लाख २० हजार रुपये दिले.
त्यानंतर प्रकरण मिटवावे लागेल, असे सांगून तिने त्याच्याकडे पुन्हा पाच लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर हॉटेल व्यावसायिकाने तिला ६० हजार रुपये दिले. परंतु आरोपी महिला धमकावत असल्यामुळे घाबरलेल्या हॉटेल व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिली.याप्रकरणी अधिक तपास उपनिरीक्षक चौधरी करत आहेत.
COMMENTS