केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी घट करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडर दरात मोठी कपात केली आहे.
नवी दिल्ली / नगर सह्याद्री : देशात सध्या महागाईने सर्वांचेच कंबरडे मोडले आहे. वाढत्या महागाईने नागरिकांत केंद्र सरकार विरोधात रोष आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती देखील भरमसाठ वाढल्याने आर्थिक बजेट कोलमडले आहे. परंतु आता एक खुशखबर आहे. गॅस सिलेंडरच्या किमती तब्बल २०० रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी घट करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडर दरात मोठी कपात केली आहे. त्यामुळे आता देशभरात गॅस सिलेंडरचे दर हे 200 रुपयांपर्यत कमी होणार आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने आजच्या बैठकीत गॅस सिलेंडरचे दर कमी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता देशभरात त्यांची अंमलबजावणी केली जाणार आहे. आगामी लोकसभेचे इलेक्शन समोर येऊन ठेपले आहे. त्यामुळे असे अनेक निर्णय सरकार घेऊ शकते.
त्यामुळे आता मोदी सरकारने सर्वसामान्यांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. दरम्यान, केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा फायदा उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना होईल, अशीदेखील माहिती जारी करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली.
या बैठकीत घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती 200 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण या निर्णयाचा फायदा सरसकट सर्वांना होणार नाही तर फक्त उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना मिळणार आहे.
COMMENTS