अहमदनगर / नगर सह्याद्री भारतीय स्टेटबँकेच्या नगरच्या क्षेत्रीय कार्यालयाच्यावतीने जिल्ह्यातील महिलाव पुरुष बचतगटांना मंजूर झालेल्या अर्थसहा...
अहमदनगर / नगर सह्याद्री
भारतीय स्टेटबँकेच्या नगरच्या क्षेत्रीय कार्यालयाच्यावतीने जिल्ह्यातील महिलाव पुरुष बचतगटांना मंजूर झालेल्या अर्थसहाय्याच्या धनादेशांचे वितरणकरण्यात आले. यावेळी ५कोटी रुपयांचे अर्थसाहाय्याचे वाटपकरण्यात आले.
जिल्ह्यातील विविधबचत गटांना दीडते २० लाखरुपये असे सुमारे ५ कोटी रुपयांच्या कर्जाचे वितरणमान्यवरांच्याहस्ते झाले. एमआयडीसी येथीलक्षेत्रीय कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी बोलताना भारतीय स्टेट बँकेचेमहाराष्ट्र व गोवा सर्कलचे मुख्यमहाप्रबंधक अरविंदकुमार सिंघ म्हणाले की,भारतीय स्टेट बँकदेशाच्या विकासासाठी काम करत आहे.नारी शक्ती मध्ये खूप क्षमता आहे. महिलांची प्रगती झाली तर देश आपोआप प्रगती करेल.
म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील एक करोड महिलांना लखपती बनवण्याचा संकल्प केला आहे.त्यासाठी भारतीय स्टेट बँक महिलांना प्राधान्याने पाठबळ देत त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करत आहेत. महिलांच्या पाठीशी स्टेटबँक खंबीरपणे उभी आहे, असे प्रतिपादन भारतीय स्टेट बँकेचे महाराष्ट्र व गोवा सर्कलचे मुख्यमहाप्रबंधक अरविंदकुमार सिंघ यांनी केले.
या कार्यक्रमास बँकेचे औरंगाबाद विभागाचे उपमहाप्रबंधक जितेंद्र ठाकूर, नगरच्या क्षेत्रिय कार्यालयाचे क्षेत्रीय व्यवस्थापक सूर्यापांडे यांच्यासह बँकेचे वरिष्ठ अधिकारी व जिल्ह्यातील विविध महिला वपुरुष बचत गटांचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS