बारामती | नगर सह्याद्री राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीचे तीव्र पडसाद पवार कुटुंबात दिसण्यास सुरुवात झाली आहे. पवार कुटुंबात दरवर्षी संयुक्...
राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीचे तीव्र पडसाद पवार कुटुंबात दिसण्यास सुरुवात झाली आहे. पवार कुटुंबात दरवर्षी संयुक्तपणे साजरा केला जाणारा रक्षाबंधनाचा सण यंदा झाला नाही. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी याची पुष्टी केली आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादीत मांडलेल्या वेगळ्या चुलीचे हे परिणाम असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी रात्री उशिरा अजित पवार यांचे मोठे बंधू श्रीनिवास पवार यांना राखी बांधल्याचा व्हिडिओ शेअर करून या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. पवार कुटुंबात दरवर्षी संयुक्तपणे रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. हा कार्यक्रम यंदा झाला नसल्याची माहिती शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांनी दिली.
सकाळी कुठे ना कुठे तरी आमच्या आधीच्या पीढीच्या बाबतीत दरवर्षी राखी बांधण्याचा कार्यक्रम होत होता. यंदाही तो झाला असता तर आम्हाला आनंद वाटला असता, असे ते बुधवारी सकाळी ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर अजित पवार रक्षाबंधनासाठी सुप्रिया सुळे यांच्याकडे जातील असा विश्वास व्यक्त केला जात होता.
पण ते गेले नाहीत. अखेर सुप्रिया सुळे यांनी सायंकाळी उशिरा रक्षाबंधनाचा एक व्हिडिओ शेअर केला. त्यात त्यांनी दरवर्षीपणाने यंदाही श्रीनिवासबापू पवार यांना राखी बांधल्याचे स्पष्ट केले. या व्हिडिओला त्यांनी हे अतूट स्नेहबंध, असे कॅप्शनही दिले.
परंतु यंदा अजित पवारांना राखी बांधली की नाही याबाबत मात्र पुष्टी नाही. त्यामुळे आता राजकीय ताण प्रचंड वाढला आहे का? भविष्यात राजकीय तणाव वाढून आणखी काही वेगळे प्राईनं दिसतील का? अशा चर्चा मात्र रंगू लागल्या आहेत.
COMMENTS