मुंबई / नगर सह्याद्री : लोकसभेच्या निवडणुकीचे पडघम सध्या वाजू लागले आहेत. लोकसभेच्या दृष्टीने सध्या प्रत्येक पक्ष पाऊल उचलत आहे. भाजपने ज...
मुंबई / नगर सह्याद्री :
लोकसभेच्या निवडणुकीचे पडघम सध्या वाजू लागले आहेत. लोकसभेच्या दृष्टीने सध्या प्रत्येक पक्ष पाऊल उचलत आहे. भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे.
याचाच एक भाग म्हणजे मोदी सरकार वाढती महागाई कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती 200 रुपयांनी कमी केल्या. निवडणुकींच्या तोंडावर हे निर्णय घेण्यात येत आहेत, हे उघड आहे.
त्यामुळे आता पेट्रोल-डिझेलचे दरात पण कपात करण्यात येईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मागील काही दिवसांचा विचार केल्यास पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कोणताच बदल झालेला नाही. या वाढत्या किमतींमुळे जनतेत नाराजी आहे.
केंद्र सरकारने गेल्या वर्षी 22 मे रोजी उत्पादन शुल्क घटविले. काही राज्यांनी पण मूल्यवर्धित करात कपात केली. पण त्यानंतर आतापर्यंत पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी दरवाढ झाली नाही. परंतु आता निवडणुकीच्या तोंडावर सरकार किती रुपयांनी पेट्रोल डिझेल कमी करणार याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.
२०२३ च्या अखेर मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांत निवडणुका होतील. निवडणुकांसाठी आतापासूनच तयारी सुरु झाली आहे. येथे सत्ता बदल होऊ नये यासाठी राज्य सरकार विविध सवलती देत आहे. त्यामुळेच पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कपातीचा निर्णय होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
COMMENTS