नाफेड, एनसीसीएफ माहिती : आणखी १५ ते २० केंद्र सुरू करणार अहमदनगर | नगर सह्याद्री केंद्र सरकारने नाफेड आणि एनसीसीएफमार्फत महाराष्ट्रातील दोन ...
नाफेड, एनसीसीएफ माहिती : आणखी १५ ते २० केंद्र सुरू करणार
अहमदनगर | नगर सह्याद्री
केंद्र सरकारने नाफेड आणि एनसीसीएफमार्फत महाराष्ट्रातील दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला. अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील शेतकर्यांकडून कांदा खरेदी करण्यात येणार आहे. या कांद्याला २ हजार ४१० रुपरे प्रति क्विंटल दर मिळणार आहे. पहिल्याच दिवशी नगर जिल्ह्यातील नेवासा तालुयात दोन केंद्रावर आणि नगरमधील एका केंद्रावर कांदा खरेदी सुरू केली असल्याची माहिती नाफेडचे नाशिक विभागाचे शाखा व्यवस्थापक निखील पदादे आणि एनसीसीएफचे एम. परिक्षित यांनी दिली.
देशातंर्गत बाजारपेठेत कांद्याचे वाढते दर रोखण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला. यामुळे महाराष्ट्रासह देशातील कांद्याचे दर पडून शेतकर्यांचे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी मंगळवारी केंद्र सरकारने शेतकर्यांचा कांदा खरेदीचा निर्णय घेतला. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी राज्यातून २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याची घोषणा केली. महाराष्ट्रातील अहमदनगर, नाशिक, लासलगाव या केंद्रांवरुन हा कांदा खरेदी करण्यात येणार आहे. आवश्यकता भासल्यास दोन लाख मेट्रिक टन पेक्षा अधिक कांदा खरेदी केला जाणार असल्याचे मंत्री गोयल यांनी स्पष्ट केले आहे.
कांद्याचा आकार आणि टिकाऊ क्षमतेचा प्रश्न
केंद्र सरकारने शेतकर्यांकडून नाफेडच्यावतीने खरेदी करण्यात येणार्या कांद्याचा आकार आणि जाडीचा प्रश्न आहे. शेतकर्यांचा आकार ४५ एमएम जाडीपेक्षा अधिक असल्यास सरकार तो खरेदी करते आणि त्यांची टिकाऊ क्षमता कमी असल्यास शेतकर्यांचा कांदा सरकारकडून खरेदी होणार नाही. यासह सरकारने कांदा खरेदीसाठी नेमलेल्या शेतकरी फार्म प्रोड्यूसर कंपनीने खेरदी केलेल्या कांद्याची रिकर्व्ह ८० टक्क्यांच्या पुढे असण्याची अट असल्याने खरेदी करणारी कंपनी आणि शेतकरी यांच्यासमोरील अडचणी वाढणार आहेत.
त्यानंतर मंगळवारपासूनच कांदा खरेदी सुरू झाली आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर राज्यातून १ लाख मेट्रिक टन नाफेडमार्फत कांदा खरेदी करण्यात येणार आहे. नाशिक विभागातील नाशिक, लासलगाव आणि अहमदनगर जिल्ह्यातून शेतकरी फार्मा प्रोड्यूसर कंपनीमार्फत कांदा खरेदी करण्यात येणार आहे. नगर जिल्ह्यात अशा २० ते २५ कंपन्या कार्यरत असून यातील दोन कंपन्यामार्फत पहिल्याच दिवशी कांदा खरेदीच्या सूचना दिल्या आहेत. नेवासा तालुयातील साई प्रवरा आणि हरी शक्ती शेतकरी फार्मा प्रोड्यूसर कंपन्यांचा यात समावेश असून येत्या दोन दिवसांत आणखी सात ते आठ कंपन्यांमार्फत नगर जिल्ह्यातील शेतकर्यांचा कांदा खरेदी होणार असल्याचे नाफेडचे निखील पदाधे यांनी सांगितले.
यासह एनसीसीएफमार्फत (नॅशनल कंज्युमर कॅपरेट फेडरेशन) नगर शहरातील केंद्रात कांदा खरेदी केंद्र सुरू केल्याची माहिती एनसीसीएफ एम. परिक्षित यांनी सांगितले. एनसीसीएफ यांची जिल्ह्यात स्वतंत्रपणे दहा केंद्र सुरू केले आहेत. त्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे परिक्षित यांनी सांगितले. यामुळे जिल्ह्यात नाफेड आणि एनएसीसीएफचे मिळून १५ ते २० केंद्र सुरू होणार आहे.
COMMENTS