विद्युत पंप व केबलच्या चोरीचे प्रमाण वाढले | पोलिस ठाण्यात शेतकर्यांची तक्रार पारनेर | नगर सह्याद्री तालुयातील पोखरी येथील पवळदरा येथून अज्...
विद्युत पंप व केबलच्या चोरीचे प्रमाण वाढले | पोलिस ठाण्यात शेतकर्यांची तक्रार
पारनेर | नगर सह्याद्री
तालुयातील पोखरी येथील पवळदरा येथून अज्ञात चोरट्यांनी सात शेतकर्यांच्या जवळपास २ हजार मीटर केबलची चोरी झाली असल्याची घटना शनिवारी रात्री घडली आहे. या केबल मधील तांब्याच्या तारा या चोरट्यांनी चोरून नेले असून केबलच्या आवरण घटनास्थळी टाकून पोबारा केला आहे. यासंबंधीची तक्रार टाकळी पोलीस ठाण्यामध्ये पोखरी येथील शेतकरी सरपंच सतीश पवार यांच्यासह ग्रा.प.सदस्य बाळासाहेब शिंदे, मथाजी करंजेकर, सर्जेराव शिंदे, भाऊसाहेब करंजेकर, मधुकर हाडोळे, परमेश्वर शिंदे, भरत शिंदे, संतोष करंजीकर यांच्यासह इतर शेतकर्यांनी दिली आहे.
या तक्रारीमध्ये शेतकर्यांनी म्हटले आहे की मुळा नदीपात्रातून पवळणारा या ठिकाणी लिफ्टिंगच्या माध्यमातून शेतीसाठी पाणी आणून त्या ठिकाणावरून शेतकरी २० व १० एचपी विद्युत पंपाच्या साह्याने शेतीसाठी पाणी उपसा करत असतात. परंतु या ठिकाणावरून या अगोदर सुद्धा मोठ्या प्रमाणावर विद्युत पंप व त्याला लागणारे केबलच्या चोरीच्या घटना घडलेल्या आहेत. या ठिकाणी असलेल्या विद्युत पंपाला जोडलेल्या २ हजार मीटर केबलमधुंन तांब्याच्या तारांची चोरी करून त्याची प्लास्टिकचे आवरण त्याठिकाणी फेकून दिली आहे. या घटनेमुळे शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सुद्धा या तक्रारींमध्ये करण्यात आली आहे.
तांब्याच्या तारा चोरणारांचे मोठे रॅकेट
तांब्याच्या तारांना मार्केटमध्ये चांगले भाव मिळत असल्याने चोरट्याने आता विद्युत पंप व केबल मध्ये असणार्या तांब्याच्या तारा चोरून विकल्या असल्याच्या घटना दिवसेंदिवस उघडकीस आले आहे. या तांब्याच्या चोरीमुळे शेतकर्यांवर मोठे संकट उभे राहिले असुन तांब्याच्या तारा चोरणारांचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शयता आहे. त्यामुळे या विद्युत पंप व केबल मधील तांब्याच्या तारा चोरणारा चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होऊ लागली आहे. तर दुसरीकडे महावितरणच्या रोहित्रामधील तांब्याच्या तारा चोरण्याच्या घटना सुद्धा दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत.
एकीकडे पावसाने दडी मारल्याने व शेतीमालाला भाव नसल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला असताना विद्युत पंप व केबल चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी पोखरी, वारणवाडी, देसवडे, मांडवे, खडकवाडी, वडगाव सावताळ, वासुंदे, कर्जुले हर्या, सावरगाव यासह मांड ओहोळ क्षेत्रातील शेतकर्यांनी केली आहे. दुष्काळी परिस्थिती सामना करीत असताना या विद्युत पंप व केबल मधील तांब्याच्या तारांची चोरी होऊ लागल्याने शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका बसू लागला आहे.
COMMENTS