मिस कॉल द्या, मतदार नोंदणी करून घ्या!

नवीन मतदार नोंदणी अभियानाचा आ. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते शुभारंभ संगमनेर | नगर सह्याद्री  लोकशाहीमध्ये मतदान हे अत्यंत महत्त्वाचे असून त...


नवीन मतदार नोंदणी अभियानाचा आ. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते शुभारंभ

संगमनेर | नगर सह्याद्री 

लोकशाहीमध्ये मतदान हे अत्यंत महत्त्वाचे असून तो मूलभूत हक्क आहे. नव्याने अठरा वर्षे पूर्ण केलेल्या युवकांना सहजासहजी मतदार नोंदणी करता यावी यासाठी भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्ताने कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या पुढाकारातून मिस कॉल द्या व मतदार नोंदणी करून घ्या या नवीन मतदार नोंदणी अभियानाच्या शुभारंभ काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार थोरात यांच्या हस्ते झाला.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर नवीन मतदार नोंदणी अभियानचा शुभारंभ झाला. यावेळी माजी प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, बाजीराव पा. खेमनर, शंकरराव पा. खेमनर, मिलिंद कानवडे, सोमेश्वर दिवटे, रामहरी कातोरे, निखिल पापडेजा, सुरेश झावरे, संतोष हासे, आर.बी राहणे यांचे सह संगमनेर तालुयातील काँग्रेस पक्षाचे व अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, व तालुयातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

८०५५९८७७७७ वर मिस कॉल द्या

८०५५९८७७७७ या दूरध्वनी क्रमांकावर नवीन मतदार नोंदणी करण्यासाठी मिस कॉल द्यावा. यानंतर त्यांना एक लिंक येईल. त्या लिंक वर आपली प्राथमिक माहिती भरून प्रत्येकाने सबमिट करावी . या नंबर वर प्रथम मतदान करणार्‍या जास्तीत जास्त युवक व युवतींनी मिस कॉल देऊन आपली मतदान नोंदणी करावी असे आवाहन ही डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केले आहे
संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा असून या तालुयातील युवकांना आपल्या मतदार नोंदणीसाठी ८०५५९८७७७७ या नंबर वर मिस कॉल दिल्यानंतर त्या व्यक्तीला एक टॅस मेसेज प्राप्त होईल त्यातील फॉर्मवर लिंक असेल त्या लिंक वर युवकांनी आपली प्राथमिक माहिती भरायची आहे व ऑनलाइन सबमिट करायची आहे.आमदार थोरात म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला राज्यघटना दिली. 

देशाच्या लोकशाही मध्ये मतदान हे अत्यंत महत्त्वाचे असून प्रत्येक मताला खूप मोठे महत्त्व आहे. अठरा वर्षे पूर्ण केलेल्या युवकांना सहजासहजी मतदार नोंदणी करता यावी यासाठी ही ऑनलाईन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, पुढील पन्नास वर्षे हे तरुणांचे आहेत. तरुणांना संधी दिली तर ते नक्कीच संधीचे सोने करत असतात. विविध क्षेत्रात संगमनेर तालुयातील युवकांनी केलेले कार्य हे कौतुकास्पद असून युवकांचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला आहे. 

माझे पहिले मत संगमनेरच्या विकासासाठी ही संकल्पना राबवताना नव तरुणांसाठी साध्या पद्धतीने ८०५५९८७७७७ या क्रमांकावर मिस कॉल दिल्यास आलेल्या लिंक वर आपली माहिती भरून द्यायची आहे. यानंतर संबंधित तरुणाकडे जनसेवक जाऊन जन्म दाखला, पॅन कार्ड ,आधार कार्ड यापैकी एक आणि रहिवासी पुरावा कोणताही असे कागदपत्रे घेऊन ते शासकीय विभागात जमा करतील म्हणजे नवीन युवकांना सहजासहजी नाव नोंदणीस मदत होईल असेही त्या म्हणाल्या.यावेळी संगमनेर तालुयातील विविध गावांमधील व संगमनेर शहरातील अनेक युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते

COMMENTS

Name

Accident,271,Ahmednagar,8711,Akole,23,BEED,6,bharat,26,braking,1360,Breaking,6753,Business,34,corona,652,court bharat,2,Cricket,2,cricket bharat,3,Crime,2395,CRIME AHMEDNAGAR,7,crime jalgaon maharastra,2,crime jalna maharastra,1,crime maharastra,23,crime nashik,1,Dhule,1,e,2,economics,10,Editorial,31,education,164,educational maharastra,3,Entertainment,1735,Epaper,29,gondia,1,Health,528,hingoli,1,indan,13,India,1530,Jamkhed,47,Karjat,11,kolhapur,2,Kopargaon,7,krishi maharastra,2,krushi ahmednagar,2,KRUSHI MAHARASTRA,4,krushi solapur,1,loni,30,m,2,ma,2,Maharashtra,7278,maharastra,63,manoranjan,58,Mumbai,629,Nagar,293,nagpur,11,nashik,9,nature maharastra,1,new delhi,5,Newasa,67,Parner,3458,Parner Ahmednagar,146,Parner Ahmednagar,13,Pathardi,22,Politics,2244,politics ahmednaga,1,politics ahmednagar,15,politics bharat,3,politics maharastra,13,pune,48,Rahata,48,Rahuri,21,SadPadsad,20,sampadkiy,104,Sangamner,193,Saripath,63,Satara,2,Shevgaon,17,shivvyakhyate-tapkir-news,1,Shrigonda,162,Shrirampur,11,social maharastra,3,solapur,9,Sport,286,sports,65,wardha,2,weather,42,World,267,yavatmal,1,
ltr
item
Nagar Sahyadri : नगर सह्याद्री: मिस कॉल द्या, मतदार नोंदणी करून घ्या!
मिस कॉल द्या, मतदार नोंदणी करून घ्या!
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj_M_pG22edhE27a0v5zZuWElQ5MlV2CbonCxj3zF-IFm8xUqxkUGgZ_mExus2z8K5HoMoH0qn_LJAtIEwIRAGks3xrfd2sB3kohoX5vSOTQmRGb-5P9ogwDZDajZ6FxyGnxfETRLgAyrWDDZNQoKM_YTpSYmbJ0BeGUv0WrdPpp4zls629z_WYJF1dvGc/s16000/THORAT.jpeg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj_M_pG22edhE27a0v5zZuWElQ5MlV2CbonCxj3zF-IFm8xUqxkUGgZ_mExus2z8K5HoMoH0qn_LJAtIEwIRAGks3xrfd2sB3kohoX5vSOTQmRGb-5P9ogwDZDajZ6FxyGnxfETRLgAyrWDDZNQoKM_YTpSYmbJ0BeGUv0WrdPpp4zls629z_WYJF1dvGc/s72-c/THORAT.jpeg
Nagar Sahyadri : नगर सह्याद्री
https://www.nagarsahyadri.com/2023/08/blog-post_84.html
https://www.nagarsahyadri.com/
https://www.nagarsahyadri.com/
https://www.nagarsahyadri.com/2023/08/blog-post_84.html
true
3854568444215913215
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content