अध्यक्ष सचिन भालेकर यांची माहिती | दक्षता समितीची स्थापना पारनेर | नगर सह्याद्री सर्वसामान्य जनतेला शासन दरबारी वैयक्तिक प्रश्नांचं सामाज...
अध्यक्ष सचिन भालेकर यांची माहिती | दक्षता समितीची स्थापना
पारनेर | नगर सह्याद्री
सर्वसामान्य जनतेला शासन दरबारी वैयक्तिक प्रश्नांचं सामाजिक प्रश्नासाठी सातत्याने संघर्ष करावा लागत असल्याने या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी परिवर्तन फाउंडेशन माध्यमातून राजकारणाविरहित चळवळ सुरू केली असल्याची माहिती परिवर्तन चे अध्यक्ष सचिन भालेकर यांनी दिली आहे.
परिवर्तन फाउंडेशन मार्फत सामाजिक, शैक्षणिक विषयावर काम सुरू असताना आता तालुक्यातील युवकांचे संघटन व मोठ बांधुन दक्षता समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती तालुक्यातील रस्ते, तहसिल, आरोग्य शिक्षण रोजगार यावर शासन दरबारी सामान्यांचे प्रश्न मांडून त्यावर मार्ग काढणार असल्याची माहीती फाउंडेशन चे अध्यक्ष सचिन भालेकर व कार्याध्यक्ष सुहास शेळके यांनी दिली.
सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करणार
पारनेर तालुका परिवर्तन फाउंडेशन ने स्थापन केलेली पारनेर तालुका दक्षता समिती ही नागरिकांसाठी काम करणारी समिती ठरेल ज्या ठिकाणी पडलेले काम असतील भ्रष्टाचार असेल विकास कामांमध्ये दिरंगाई किंवा निकृष्ट दर्जाची कामे असतील या ठिकाणी समिती घाव घालील आणि प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम संविधानिक पद्धतीने केला जाईल
- सचिन भालेकर, अध्यक्ष, सुहास शेळके परिवर्तन फौंडेशन, पारनेर.
पारनेर येथील सेनापती बापट सभागृहात फाउंडेशन ची बैठक पार पडली त्यावेळी त्यांनी दक्षता समितीची भुमिका स्पष्ट केली. या दक्षता समितीच्या अध्यक्षपदी सर्वप्रथम मनिषा ठुबे यांना संधी दिली आहे. सोमनाथ जाधव यांची कार्याध्यक्ष, शिवाजी औटी उपाध्यक्ष, अमर भालके सचिव पदी नेमणूक करण्यात आली आहे. त्याखालोखाल आरोग्य समिती डॉ. सुभाष मावळे, शिक्षण समिती निशिकांत रोहकले, तहसिल समिती अविनाश पवार, बांधकाम समिती सुहास शेळके यांची अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. नितीन म्हसके, संदिप घुले, शांताराम कवाद, अशोक जाधव, नरेश सोनवणे, रमेश लामखडे, समिर शेख, राहुल गाडगे, पुरुषोत्तम शेंडकर, तुषार बांडे, महेश शिंगोटे, अजय शेळके यांची विविध समितीवर सदस्य पदी नेमणूक करण्यात आली आहे.
COMMENTS