अहमदनगर | नगर सह्याद्री अहमदनगर शहरात सिना नदीचे पात्र सुमारे १३ किमीचे असून यात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे, हा गाळ आता जलसंपदा विभागाच्...
अहमदनगर शहरात सिना नदीचे पात्र सुमारे १३ किमीचे असून यात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे, हा गाळ आता जलसंपदा विभागाच्या वतीने काढण्यात येणार असल्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या ऑनलाइन बैठकीत घेण्यात आला असल्याचे खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.
मुंबई येथे मंत्रालयात ऑनलाइन झालेल्या या बैठकीत अहमदनगर शहरातून जाणार्या सीना नदीच्या पात्रातील मोठ्या प्रमाणावर साचलेला गाळ आता जलसंपदा विभाग त्यांच्या कडील मशिनरी देवून काढणार असून या मशिनरी करिता लागणारे इंधन हे जिल्हा नियोजन समितीतून देण्यात येणार असल्याचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी घेतला असून हा निर्णय झाल्याने अहमदनगर शहरतील सिनानदीची पुर नियंत्रण रेषा ही स्थलांतरित होईल. हा निर्णय नगर शहरासाठी अत्यंत महत्वाचा असून यामुळे पुराचे पाणी नगर शहरात येणार नाही. पर्यायाने नागरिकांचे होणारे मोठे आर्थिक नुकसान हे टाळले जाईल.
शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांचा पाठपुरावा
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पूर नियंत्रण रेषेबाबत पुर्न सर्वेक्षण व्हावे यासाठी शेतकरी व बांधकाम व्यावसायिक यांच्यासह वेळोवेळी शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी मागण्याचे निवेदन देऊन या संदर्भात कारवाई करण्यासाठी पाठपुरावा केला होता, या पाठपुराव्यांतर मंत्री विखे पाटील यांनी या संदर्भात कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते, याच आश्वासनाची या निमित्ताने पूर्तता केली आहे. या पूर्तेते नंतर आगरकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपुख्यमंत्री अजित पवार, महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचे जाहीर आभार व्यक्त केले आहेत.
नगर शहरातील नागरिक तसेच व्यापारी यांनी या संदर्भात वेळोवेळी मागणी केली होती यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे या बाबत पाठपुरावा केला त्यावरून आज मंत्रालयात ही बैठक संपन्न झाली. नगरकरांना आता दिलासा मिळाला आहे. या बैठकीला नियोजन विभागाचे मुख्य सचिव ओ पी गुप्ता, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दिपक कपूर ,जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यांची उपस्थिती होती.
COMMENTS