अहमदनगर | नगर सह्याद्री जीवे मारण्याचा प्रयत्न करुन वाहनचालकाकडून बळजबरीने पैसे हिसकवणारे आरोपी जेरबंद करण्यात नगर तालुका पोलीसांना यश आले आ...
अहमदनगर | नगर सह्याद्री
जीवे मारण्याचा प्रयत्न करुन वाहनचालकाकडून बळजबरीने पैसे हिसकवणारे आरोपी जेरबंद करण्यात नगर तालुका पोलीसांना यश आले आहे.
लोणी सय्यदमीर येथून एक पिकअप चालक व त्यांचा कामगार आगरबत्ती व चिप्सची डिलेव्हरी देऊन जात असताना तीन इसमांनी लोणी सय्यदमीरच्या पुलाच्या जवळ त्यांची मोटारसायकल पिकअपला आडवी लावली. त्यांना चिप्स मागितले असता पिकअप चालकाने माल पॅकबंद असल्याने देता येणार नसल्याचे सांगितले. त्यातील तीन इसमांपैकी एका इसमाने पिकअप चालकाची पैशांची बॅग हिसकवण्याचा प्रयत्न केला. पिक अपचालकाने हिसका देऊन लगेच तेथून निघाला.
तीघांनी त्यांचा पाठलाग केला, तसेच एकाला याची माहिती देऊन वाटेफळ येथे पिकअप चालकास अडविले. शुभम उर्फ बाबु दिलीप चौधरी याने जीवे मारण्याच्या उद्देशाने चाकुन भोकसले व तीघांपैकी भवानी पवार याने कामगाराचे दात रॉडने पाडले. सागर वाळके याने तो रॉड घेवुन फिर्यादीच्या हातावर मारला. शुभमने पिकअफ चालकास वाचविण्यास आलेल्या त्यांचे वडील व भावालाही चाकुने भोकसले. पैशांची बॅग व त्यातील १३,६५० रुपये घेऊन मोटारसायकलवरून पळुन गेले.
नगर तालुका पोलीस स्टेशनला भवानी पवार (पुर्ण नाव गाव माहीत नाही), सागर अशोक वाळके (रा. लोणी सय्यदमीर, ता. आष्टी जि. बीड), शुभम उर्फ श्रीकेशर बंडु मोकळे (रा. वाटेफळ ता. जि. अहमदनगर) व शुभम उर्फ बाबु दिलीप चौधरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशीरकुमार देशमुख यांनी पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण व पोलीस पथकास शोध घेण्याच्या सूचना केल्या. पोकों राजु खेडकर यांनी तांत्रिक विश्लेषनाद्वारे गुन्ह्यातील आरोपी सागर अशोक वाळके, शुभम उर्फ श्रीकेशर बंडु मोकळे हे अर्धपिंप्री (ता. गेवराई जि. बीड)येथे असल्याचे निष्पन्न केले. पथकाने तेथे जाऊन आरोपींना ताब्यात घेतले.
COMMENTS