मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या वतीने वाकथॉन पारनेर | नगर सह्याद्री पारनेर डॉक्टर असोसिएशनच्या वतीने वॉकथॉन हा उपक्रम समाजहिताचा असून यामुळ...
मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या वतीने वाकथॉन
पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर डॉक्टर असोसिएशनच्या वतीने वॉकथॉन हा उपक्रम समाजहिताचा असून यामुळे निरोगी व सक्षम पिढी घडवण्यात मदत होणार आहे. डॉक्टरांनी नुसतेच सल्ले देऊन पेशंटची काळजी करण्यापेक्षा पारनेर मेडिकल असोसिशन च्या माध्यमातून अशा उपक्रमांनी स्वास्थाबाबत नवीन संदेश जनतेत जाऊन व्ययामाची गरजेची जनजागृती होणार असल्याचे मत यावेळी नगर सह्याद्री, न्यूज २४ सह्याद्रीचे मुख्य संपादक शिवाजी शिर्के यांनी व्यक्त केले.
पारनेर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन च्या वतीने आयोजित वाकथॉन हा चालण्याच्या स्पर्धा रविवार दिनांक १३ ऑगस्ट २०२३ पारनेर येथे संपन्न झाली. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अहमदनगर प्रेस क्लबचे अध्यक्ष, संपादक शिवाजी शिर्के, श्रीशा हॉस्पिटल अहमदनगरचे अस्थिरोग तज्ञ डॉक्टर गजेंद्र पबळ, पत्रकार उदय शेरकर उपस्थित होते.
या उपक्रममध्ये पारनेर तालुक्यातील १८० डॉक्टर सहभागी झाले. या वाकेथॉन स्पर्धेची सुरुवात पारनेर येथील गणेश मंगल कार्यालय, पानोली रोड ते पानोली घाट येथे संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी प्रायोजक म्हणुन साई दीप हॉस्पिटल अहमदनगर, श्रीशा हॉस्पिटल, अहमदनगर, ओवी डायनास्टिक सेंटर, पारनेर हे होते
या कार्यक्रम प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष डॉ. संजय बाडे, उपाध्यक्ष डॉ. अजय येणारे, खजिनदार डॉ. संदीप औटी, सचिव डॉ. महेश ठुबे, डॉ. सुनील कदम, डॉ. अजित लंके, डॉ. भाऊसाहेब खिलारी, डॉ. भास्कर शिरोळे, डॉ. पांडुरंग थोरात, डॉ. रावसाहेब आग्रे, डॉ. अरविंद नांगरे, डॉ. संतोष हांडे, डॉ. सुरेश पठारे, डॉ. सुशील पादिर, डॉ. सोमेश्वर आढाव, डॉ. सरोदे, डॉ. संजय सातपुते, डॉ. रमेश गवळी, डॉ सुभाष डेरे, डॉ. श्रीकांत पठारे, डॉ. सौ तनुजा रोहोकले, डॉ. पद्मजा पठारे, डॉ. शोभा गायके, डॉ. सोनल तांबे. यांच्या समवेत तालुक्यातील सर्वच डॉक्टर उपस्थित होते.
COMMENTS