पारनेर | नगर सह्याद्री पारनेर नगरपंचायतीच्या अंतर्गत येणार्या सोबले वाडीतील स्मशानभूमी मध्ये मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य असून प्लास्ट...
पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर नगरपंचायतीच्या अंतर्गत येणार्या सोबले वाडीतील स्मशानभूमी मध्ये मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य असून प्लास्टिक कचर्यासह इतर अस्वच्छता झाली आहे. या ठिकाणी अंत्यसंस्कार वेळी लाईटची कोणत्याही प्रकारची सुविधा नाही. त्यामुळे या गैरसोयी बाबत स्थानिक ग्रामस्थांमध्ये नाराजी असून तातडीने स्मशानभूमीची स्वच्छता करून या ठिकाणी लाईटची व्यवस्था करावी अशी मागणी भाजपाचे नगरसेवक अशोक चेडे यांनी नगरपंचायत प्रशासनाकडे केली आहे. तातडीने या सोयी सुविधा उपलब्ध कराव्या अन्यथा लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा नगरसेवक अशोक चेडे डे यांनी दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मी स्वतः सोमवार दि २८ ऑगस्ट २०२३ रोजी सोबलेवाडी या ठिकाणी रात्री ११ वाजता अंत्यविधीसाठी गेलो असता तेथील स्मशानभूमीमधील अस्वच्छता, प्लास्टिक पिशव्या व सर्व परिसरात गवत वाढलेले आहे. तेथे लाईटीची देखील सोय नाही. अशा परिस्थितीमध्ये अंत्यसंस्कार कसे करायचे. तसेच तेथे आलेले दुःखाकीत लाईट नसल्यामुळे व घाणीच्या साम्राज्यमुळे अंत्यविधी करण्यास तयार नव्हते. मी स्वतः मध्यस्थी करून संबधी ग्रामस्थांना व नातेवाईकांना अंत्यविधी करण्यासाठी विनंती केली.
ही बाब अतिशय गंभीर असून याची त्वरित दाखल घेण्यात यावी. वार्ड क्र. १३ मधील ज्या ठिकाणी मा. पारनेर न्यायदंडाधिकारी साहेब सरकारी क्वार्टर परिसर आहे. तेथील लाईट देखील बंद आहे. विद्युत कर्मचारी ठोंबरे यांना वारवार सांगून त्या बाबीकडे दुर्लक्ष केले आहे. यावर योग्य ती कारवाई व्हावी. वरील दोन विषयांवर पारनेर नगरपंचायतीकडुंन तातडीने यावर कार्यवाही न झाल्यास समस्त सोबलेवाडी ग्रामस्थ व मी स्वतः आपल्या दालनात लाक्षणिक उपोषण करणार आसल्याचे अशोक चेडे यांनी निवेदनात म्हटले आहे.
COMMENTS