निघोज | नगर सह्याद्री वडनेर बुद्रुक तालुका पारनेर येथील सेवा सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या निवडी बिनविरोध झाल्या. चेअरमनपदी दि...
निघोज | नगर सह्याद्री
वडनेर बुद्रुक तालुका पारनेर येथील सेवा सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या निवडी बिनविरोध झाल्या. चेअरमनपदी दिलीप चौधरी यांची तर व्हाईस चेअरमनपदी खंडू बोचरे यांची निवड झाली.
चेअरमन लक्ष्मण बोर्हाडे व व्हा. चेअरमन काशिनाथ वाजे यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिल्यामुळे रिक्त जागी नवीन पदाधिकार्यांच्या निवडी करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तात्यासाहेब भोसले यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली.
चेअरमन पदासाठी दिलीप चौधरी यांनी तर व्हा. चेअरमन पदासाठी खंडू बोचरे यांनी अर्ज दाखल केले. चेअरमन, व्हाईस चेअरमनपदासाठी एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली. यावेळी सोसायटीचे संचालक बाबाजी बाबर, काशिनाथ वाजे, अनंथा जगदाळे, अशोक वायदंडे, सिंधुबाई बाबर हे उपस्थित होते. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात निवडी झाल्यानंतर सर्वांना संधी देण्याचे धोरण ठरल्यामुळे बोर्हाडे व वाजे यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते त्यांच्या जागी चौधरी व बोचरे यांना संधी देण्यात आली आहे.
निवडीनंतर नूतन पदाधिकार्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार निलेश लंके प्रतिष्ठानचे निघोज गण प्रमुख सुनील बाबर, माजी चेअरमन कचरु बाबर, रामचंद्र चौधरी, रामदास चौधरी, अंकुश बाबर, सुरेश जगदाळे, दत्ता थोरात, चंद्रकांत वाजे, शंकर चौधरी, रामदास भालेकर, सुदाम बाबर, श्रीकांत चौधरी यांच्यासह आदी उपस्थित होते. सोसायटीचे सचिव जयसिंग पवार यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.
दरम्यान, आ. नीलेश लंके, जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका गीतांजली शेळके, संचालक प्रशांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकर्यांचा विकास झाला पाहिजे यासाठी प्रयत्नशील राहणार असून शेतकर्यांना राज्य सरकार व जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून मिळणार्या योजनांचा पाठपुरावा करणार असल्याची माहिती यावेळी नूतन पदाधिकारी व संचालक मंडळांनी दिली.
COMMENTS