शिवसेना व शिवबा संघटनेची मागणी निघोज | नगर सह्याद्री पारनेर तालुयातील विविध शासकीय रुग्णालयांमध्ये लस उपलब्ध करणे व विविध बससेवा सुरु करण्या...
शिवसेना व शिवबा संघटनेची मागणी
निघोज | नगर सह्याद्री
पारनेर तालुयातील विविध शासकीय रुग्णालयांमध्ये लस उपलब्ध करणे व विविध बससेवा सुरु करण्यासाठी शिवसेना व शिवबा संघटनेने निवेदन दिले. तालुयातील बहुतांश प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंश, कुत्रा चावल्यानंतरच्या लसीबाबत तसेच रुग्णालयात २४ तास डॉटर उपलब्ध राहवा यासाठी मागणी केली.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी बागल यांच्याशी लस व इतर प्रश्नासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. विद्यार्थ्यांसाठी बससेवा सुरळीत असणे गरजेचे आहे. निघोज-मुंबई रातराणी, गोरेगाव मुक्कामी, पारनेर ते गोरेगावपर्यंत येणारी बस हिवरे कोरडा गावात येऊन पारनेर ला जावी अशी मागणी केली. आगार प्रमुखांशी या संदर्भात चर्चा झाली. आठ दिवसात हा प्रश्न मार्गी न लागल्यास आंदोलनाचा इशारा तालुकाप्रमुख श्रीकांत पठारे व युवासेना तालुका प्रमुख तथा शिवबा अध्यक्ष अनिल शेटे यांनी दिला.
निवेदन देते वेळी शिवसेना तालुका प्रमुख श्रीकांत पठारे, शिवबा संघटना अध्यक्ष अनिल शेटे, महिला आघाडी प्रमुख प्रियंका खिलारी, उपनगराध्यक्ष राजूशेठ शेख, बाजार समितीचे संचालक शंकर नगरे, शिवबा दुर्गसंवर्धन परिवार अध्यक्ष राजुभाऊ लाळगे, शिवबा संघटना तालुकाप्रमुख बबनराव तनपुरे, अल्पसंख्याक तालुकाप्रमुख नौशाद पठाण, युवक तालुकाप्रमुख यशोदिप रहाणे, शिवसेना संघटक अमोल गाजरे, नागेश नरसाळे, शरद बोर्हाडे, पारनेर शहरप्रमुख नीलेश दरेकर, शेतकरी संघटना प्रमुख जयराम सरडे, अंकुश अडसूळ, गोकुळ वाजे, सोशल मिडिया प्रमुख नीलेश वरखडे, दत्ता टोणगे, शांताराम पाडळे, प्रितेश पानमंद, संकेत सरोदे, विकास गाजरे, शाहिद पठाण, तुषार शिंदे, भैय्या खोडदे, हकलाक शेख आदी उपस्थित होते. दोन्ही अधिकार्यांनी शिवसेना व शिवबा संघटनेच्या मागणींची दखल घेण्याचे आश्वासन दिले.
COMMENTS