कोहकडीत आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन पारनेर | नगर सह्याद्री आजच्या धावपळीची युगात वैयक्तिक आरोग्याच्या समस्या वाढत चालल्या असून गावागावा...
कोहकडीत आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन
पारनेर | नगर सह्याद्री
आजच्या धावपळीची युगात वैयक्तिक आरोग्याच्या समस्या वाढत चालल्या असून गावागावात समाज स्वास्थ्यासाठी आरोग्य शिबिरे हि काळाजी गरज मत विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांनी व्यक्त केले आहे. पारनेर तालुक्यातील कोहकडी येथे शिवसेना युवासेना व शिवबा संघटनेच्या वतीने आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य विधानसभा माजी उपाध्यक्ष विजयराव औटी साहेबांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना मा. आमदार औटी म्हणाले कि आरोग्य शिबीराच्या माध्यमातून समाजकारण करणे हि काळाची गरज आहे. तरुणांनी व ग्रामस्थांनी चांगल्या विचाराची वाट कधीही सोडु नये. काम करणार्या स्थानिक कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे राहण्याचे आवाहन केले. हे शिबीर यशस्वी होण्यासाठी शिवसेनेचे चंद्रशेखर ढवण, शिवबा संघटनेचे दत्ता टोणगे, संतोष बढे, विजय मदगे यांनी युवासेना तालुका प्रमुख तथा अध्यक्ष शिवबा संघटना मा. अनिल शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष परीश्रम घेतले. यावेळी मिरा नर्सिंग होम व संजीवनी ब्लड बँक ने विशेष सहकार्य केल्याबद्दल त्यांचे दत्ता टोणगे यानी आभार मानले.
यावेळी रामदास भोसले, डॉ श्रीकांत पठारे, डॉ भास्कर शिरोळे, अनिल शेटे, संजय झरेकर, बबन तनपुरे, रोहिदास लामखडे, शंकर वरखडे, खंडु लामखडे, बाबाजी लामखडे, जयराम सरडे, माऊली खोसे, नागेश नरसाळे, सोमनाथ भाकरे, केशव शिंदे, यश राहाणे, सचिन कोतकर, किसन चौधरी, गोरख टोणगे, कैलास डोमे, नरेश सोनवणे, राजु गोगडे, कैलास कोलपे, आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी सर्व मान्यवरांचे आभार चंद्रशेखर ढवण यानी मानले.
COMMENTS