संगमनेर।नगर सहयाद्री- संगमनेर येथील एका महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणार्या अल्पवयीन मुलीला विविध ठिकाणी नेवून तिच्यावर अत्याचार केल्याची ख...
संगमनेर।नगर सहयाद्री-
संगमनेर येथील एका महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणार्या अल्पवयीन मुलीला विविध ठिकाणी नेवून तिच्यावर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. त्यामुळे तालुयात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत संगमनेर शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अल्पवयीन मुलगी संगमनेर शहरातील एका महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहे. एप्रिल २०२३ ते २१ ऑगस्ट दरम्यान आशिष राऊत व किरण सोपान राऊत (दोघे रा.मालुंजकर वस्ती, राऊतमळा, घुलेवाडी) यांनी या अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत तिला फुस लावून संगमनेर, शिर्डी, पेमगिरी, विठ्ठलकडा, कर्हेघाट अशा विविध ठिकाणी नेवून तिच्यावर वारंवार अत्याचार केला आहे. त्यानंतर सागर मालुंजकर, कॅफे मालक व लॉज मालक या दोघांनी अशिष व किरण यांना मदत केली आहे.
याप्रकरणी पिडीत अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जाधव हे करत आहे. दरम्यान या घटनेने तालुयात एकच खळबळ उडाली आहे. पुन्हा एकदा संगमनेर शहरातील गोंडस कॅफेच्या नावाखाली बेकादेशीर कृत्य करण्याचा धंदा चालू आहे हे या घटनेतून सिद्ध होत आहे. एकूणच संगमनेर शहरातील अवैध कॅफे चालक यांच्यावर कारवाई होऊन ते बंद व्हावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
COMMENTS