अहमदनगर | नगर सह्याद्री - कायद्यानुसार पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्याशिवाय दुसरे लग्न करण्यास मान्यता नाही. मात्र नगरमध्ये एका व्यक्तीने पह...
अहमदनगर | नगर सह्याद्री -
कायद्यानुसार पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्याशिवाय दुसरे लग्न करण्यास मान्यता नाही. मात्र नगरमध्ये एका व्यक्तीने पहिल्या पत्नीला अंधारात ठेवून दुसर्यांदा बोहल्यावर चढण्याचा प्रयत्न केला. याची माहिती मिळताच पहिल्या पत्नीने मंडपातच राडा केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
लग्नघटीका जवळ येत असताना पहिल्या पत्नीने मंडपात एंट्री केली. यावेळी एकच गोंधळ उडाला. घटस्फोट न देताच पती लग्न करत असल्याचे पाहून पहिली पत्नी संतप्त झाली. पीडित महिला म्हणाली, १२ वर्षांपूर्वी आमचे लग्न झाले होते. लग्नानंतर मला त्रास देण्यात येत होता. अडीच वर्षापूर्वी मला घरातून हाकलून दिले होते. मला अचानक माहिती मिळाली, अहमदनगरमध्ये एका हॉटेलमध्ये आपला पती लग्न करत आहे.
त्यानंतर त्याला पकडून आम्ही पोलिसांत दिले. गुन्हा दाखल झाल्याप्रमाणे कारवाई व्हावी, तसेच जे माझ्यासोबत झाले, ते इतर कोणासोबत होऊ नये. बोहल्यावर चढण्याचा प्रयत्नात असलेल्या विशाल पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीप्रमाणे तपास सुरू असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक जे. सी. मुजावर यांनी सांगितले.
COMMENTS