अहमदनगर | नगर सह्याद्री गुरुजींनी एकमेकांचा केलेला अपमान सहन न झाल्याने मानअपमानाचे नाट्य शिक्षक बँकेच्या सभेमध्ये पहायला मिळाले. महत्त्वाच...
अहमदनगर | नगर सह्याद्री
गुरुजींनी एकमेकांचा केलेला अपमान सहन न झाल्याने मानअपमानाचे नाट्य शिक्षक बँकेच्या सभेमध्ये पहायला मिळाले. महत्त्वाचा असलेला सभासदांचे पैसे वळविण्याच्या विषयाला स्थगिती देण्यात आली. शिक्षकांनी आजवरची परंपरा कायम राखत यंदाच्या वर्षी देखील जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या सभेत गदारोळ झालेला पाहायला मिळाला.
नगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची१०४ वी वार्षिक सर्वसाधारण आज (रविवार) सभा सुखकर्ता लॉन नगर कल्याण रोड या ठिकाणी पार पडली. बँकेचे अध्यक्ष संदीप मोटे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा घेण्यात आली. यावेळी सभासदांच्या कायम ठेवीतून प्राथमिक शिक्षक विकास मंडळाकडे रक्कम वर्ग करु नये या विषयावर शिक्षकांनी गोंधळ घातला.
विरोधकांनी सत्ताधार्यांना घेरले
कायम ठेव वर्ग करू नका, सभासदांना त्यांच्या हक्काचे पैसे द्या, रुग्णालय बांधण्यात येणार आहे त्यासाठी शिक्षक सभासदांनी विरोध दर्शवला. सत्ताधार्यांनी घेतलेल्या निर्णयाच्या विरोधामध्ये विरोधकांनी जोरदार सभागृहामध्ये घोषणाबाजी करत फलक झळकावत सत्ताधार्यांना चांगला जाब विचारला. यावरून सभागृहामध्ये एकच गोंधळ उडाला, यावर बँकेचे बापूसाहेब तांबे यांनी उगाच गोंधळ घालू नका, विरोधासाठी विरोध करू नका. कमिटीने तीन महिन्यात निर्णय घ्यावा, अशी भूमिका मांडली होती. ती भूमिका सभासदांना मान्य झाली नाही. म्हणून आता नव्याने कमिटी नेमण्याचा निर्णय संजय कळमकर यांच्या अधिपत्याखाली घेण्यात आला.
दरम्यान या सभेत गुरुजींनी एकमेकांचा केलेला अपमान सहन न झाल्यामुळे सर्वसाधारण सभेमध्येच शिक्षक एकमेकांविरोधात घोषणाबाजी करू लागले.हे गोंधळ एवढ्यावरच न थांबता शिक्षक थेट एकमेकांच्या अंगावर धावून देखील गेले.
सत्ताधारी जोपर्यंत आपल्या बद्दल माफी मागत नाहीत, तोपर्यंत आम्ही सभा चालू देणार नाही, असा पवित्रा यावेळी शिक्षकांनी घेतला होता. अखेरीस शिक्षक सभासदांचे पैसे वळवण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. कमिटी नेमून निर्णय घ्यावा असे एकमेकांमध्ये ठरल्यामुळे ही सभा पुढे सुरू राहिली.
COMMENTS