मयुरला स्वतःच्या पायावर उभे करणार | तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने शस्त्रक्रिया, उपचार पारनेर | नगर सह्याद्री घरची परिस्थिती बेताची असल्याने ...
मयुरला स्वतःच्या पायावर उभे करणार | तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने शस्त्रक्रिया, उपचार
पारनेर | नगर सह्याद्री
घरची परिस्थिती बेताची असल्याने आई शिवणकाम करत असल्याने जीवनाचा आधार असलेल्या काळजाच्या तुकडा आसणार्या मयुरला तिसरीचे शिक्षण घेत असताना अचानक दिव्यांगत्व आले. कमरेपासून खालच्या भागाच्या संवेदना गेल्याने एका जागेवर बसून आहे. त्यामुळे या मातेने आपल्या मुलाची कैफियत आमदार निलेश लंके यांच्या कानावर घालताच वडनेर बुद्रुक येथील मयुर दत्तात्रय भालेकर या मुलाच्या उपचाराची जबाबदारी आ. नीलेश लंके यांनी घेतली असून लवकरच त्याच्यावर पुणे किंवा मुंबईतील हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
मयुरला आमदार लंकेकडून मोबाईलची भेट..
आ. निलेश लंके यांच्या भेटीनंतर खुष झालेल्या मयुरला तुला काय हवे अशी विचारणा आ. लंके यांनी केली. माझ्या आजारामुळे मला शाळेत जाता येत नाही. घरी एकटाच असल्याने वेळ जात नाही. मला एखादा मोबाईल मिळाला तर त्यातून मी अभ्यास करू शकेल, काहीतरी सकारात्मक बाबी वाचून, पाहून मला उर्जा मिळेल असे मयुर म्हणाला. चारच दिवसांत आ. लंके यांनी पारनेर येथे मोबाईल खरेदी करून सुनील बाबर यांच्या मार्फत मयुरकडे सुपूर्दही केला.
आ. निलेश लंके हे जागरण गोंंधळाच्या कार्यक्रमानिमित्त वडनेर बुद्रुक येथे गेले असता तिथे एक महिला भगिनीने माझ्या घरी माझा छोटा मुलगा तुमची आतुरतेने वाट पाहत आहे. तुम्ही त्याला भेटण्यासाठी घरी यावे अशी विनंती त्या महिलेने केली. आ. लंके यांनी माहिती घेतली असता त्यांना मयुरच्या आजाराबाबत समजले.
माझ्या कामाची पावती
मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना मयुरसारखा मुलगाही माझ्या कामाची दखल घेउन प्रेम व्यक्त करतो ही माझ्या कामाची पावती आहे. माझा लढा हा नेहमीच मतदारसंघातील विविध विकास कामे, विविध प्रश्न यासाठी आहे. जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारीही माझीच आहे. त्याच जबाबदारीच्या जाणीवेतून मी मयुरच्या पुढील उपचाराची, शस्त्रक्रियेची जबाबदारी घेतली आहे.
-नीलेश लंके,आमदार
आ. लंके हे तेथून तडक भालेकर यांच्या घरी पोहचले आणि त्यांनी मयुर याची आस्थेवाईकपणे चौकशी केली. मयुरची आई सांगत होती की, तिसरीचे शिक्षण सुरू असताना मयुर ठणठणीत होता. अचानक त्याच्या कमरेखालच्या भागाच्या संवेदना गेल्याने तो एका जागेवर बसून आहे. त्याच्या उपचाराचा, औषधांचा खर्च मोठा असून औषधोपचारासाठी रात्रंदिवस शिवणकाम करत आहे.
मयुरच्या आजाराबाबत माहीती देताना आईचा कंठ दाटून आला. आ. लंकेही ही माहिती ऐकूण स्तब्ध झाले. आ. नीलेश लंके यांनी स्वतःला सावरत तुम्ही मयुरच्या उपचाराची काळजी करू नका. त्याची जबाबदरी मी घेतो असे सांगत त्यांनी मयुरच्या पालकांना दिलासा दिला. तेथूनच पुण्या-मुंबईच्या डॉक्टरांशी संपर्क करून लंके यांनी मयुरच्या आजाराबाबत माहिती दिली. डॉक्टरांच्या सुचनांप्रमाणे डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. बाळासाहेब कावरे यांना लंके योनर लवकरात लवकर उपचाराची व्यवस्था करण्याच्या सुचना दिल्या.
आमदार लंकेंना दिव्यांगाप्रती आस्था
मयुर याच्या भेटीनंतर त्याच्या आजारावर आजवर करण्यात आलेल्या उपचाराच्या फाईल्स पारनेर येथे पोहच करण्याची माझ्यावर आमदारांनी जबाबदारी सोपविली होती. या फाईल पारनेर येथे डॉ. बाळासाहेब कावरे यांच्याकडे सुपूर्द केल्यानंतर डॉ. कावरे यांनी तात्काळ त्या फाईल्स संबंधित डॉक्टरांकडे पाठविल्या. त्याबाबत आ. लंके यांना माहिती देण्यात आल्यानंतर त्यांनी संपर्क कार्यालयात येउन मयुरसाठी घेतलेला मोबाईलही घेऊन जा असे सांगितले. मयुरच्या उपचाराबरोबच त्याला हव्या असलेल्या मोबाईसाठीही आ. लंके यांनी दाखविलेली सतर्कता आदर्श लोकप्रतिनिधीला साजेशी असून त्यांना दिव्यांगाप्रती आस्था असल्याचे दिसून येत आहे.
-सुनील बाबर, वडनेर बुद्रुक.
COMMENTS