आईने प्रेमात अडथळा आणणाऱ्या पोटच्या मुलाचा गळा घोटून खून केल्याची घटना समोर आली आहे. सदर घटना जेजुरी मधील मोडलिंब येथे घडली आहे.
पुणे / नगर सह्याद्री : समाजात अनेक काळीज हेलवणाऱ्या घटना समोर येत असतात. आता आणखी एक हादरवणारी घटना समोर आली आहे. आईने प्रेमात अडथळा आणणाऱ्या पोटच्या मुलाचा गळा घोटून खून केल्याची घटना समोर आली आहे. सदर घटना जेजुरी मधील मोडलिंब येथे घडली आहे.
मोडलिंब येथे राहणाऱ्या आई आणि तिच्या प्रियकराच्या प्रेमात अडथळा ठरणाऱ्या चार वर्षाच्या चुटक्या नावाच्या चार वर्षीय चिमुरड्याचा गळा दाबून खून केला. त्याचा मृतदेह पुरंदर तालुक्यातील माळशिरसजवळील घाटात फेकून दिला होता. ही घटना दीड महिन्यांपूर्वी घडली होती.
जेजुरी पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला असून दोघांना ताब्यात घेतलं आहे. चुटक्या शंकर पवार असे मयत मुलाचे नाव आहे. रेणू पवार असे आईचे नाव असून उमेश अरुण साळुंके असे तिच्या प्रियकराचे नाव आहे. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणी जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मोडलिंब येथे राहणारे रेणू पवार आणि उमेश साळुंके यांच्यात प्रेमसंबंध होते. त्यांच्या या प्रेमसंबंधात चिमुरड्याचा अडथळा येऊ लागला.
या दोघांनी त्याचा गळा दाबला. तो मेल्यानंतर त्याचे प्रेत साडीत गुंडाळून पुरंदर तालुक्यातील भुलेश्वर घाटात फेकून दिले होते. आता ही घटना उघडकीस आली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
COMMENTS