नगर सह्याद्री टीम AIMIM चे राष्ट्रीय अध्यक्ष असुदुद्दीन ओवैसी यांच्या सभेबाबत एक बातमी समोर आली आहे. त्यांची सभा सुरु असताना सभेत काहींनी प...
नगर सह्याद्री टीम
AIMIM चे राष्ट्रीय अध्यक्ष असुदुद्दीन ओवैसी यांच्या सभेबाबत एक बातमी समोर आली आहे. त्यांची सभा सुरु असताना सभेत काहींनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या.
सध्या झारखंडच्या डुमरीमध्ये विधानसभेच्या पोटनिवडणुकीची धामधूम सुरु आहे. त्या ठिकाणी AIMIM ने आपला उमेदवार उभा केला आहे. त्या उमेदवाराच्या प्रचारासाठी असुदुद्दीन ओवैसी यांची बुधवारी एक सभा झाली. या सभेदरम्यान काही लोकांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या.
या घोषणा ऐकून ओवैसींनी त्यांना टोकलं. त्यांच्यावर ओरडले. ‘तुम्ही शांत बसा व मी जे म्हणतोय ते ऐका’ असं असुदुद्दीन ओवैसी घोषणा देणाऱ्यांना म्हणाले. ओवैसी यांच्या सभेतील आपत्तीजनक घोषणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
या घोषणा कोणी दिल्या? त्यांना शोधून कारवाई करण्यासाठी डुमरी जिल्हा प्रशासनाने हालचाली सुरु केल्या आहेत. ओवैसी यांच्या सभेत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या जाणं, हे अत्यंत दुर्देवी आणि लज्जास्पद असल्याच भाजपाने म्हटलं आहे. दरम्यान ओवैसींनी सुद्धा यावर नाराजी व्यक्त केली आहे.
याआधीही असे घडले आहे -
सन 2022 मध्ये मांडर पोटनिवडणुकीच्यावेळी AIMIM चे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी रांची एयरपोर्टवर आले होते. त्यावेळी विमानतळावर उपस्थित त्यांच्या समर्थकांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या होत्या. झारखंड मध्ये देखील असे झाले आहे. ओवैसींनी सुद्धा यावर नाराजी व्यक्त केली आहे.
COMMENTS