अहमदनगर | नगर सह्याद्री वकील हा समाजातील महत्त्वाचा घटक असून, दीन-दुबळ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम हा वर्ग करत असतो. जिल्हा न्यायालयात क...
अहमदनगर | नगर सह्याद्री
वकील हा समाजातील महत्त्वाचा घटक असून, दीन-दुबळ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम हा वर्ग करत असतो. जिल्हा न्यायालयात कार्यरत युवा विधीज्ञ राष्ट्रवादी पक्षाच्या विधी कक्षाला जोडले गेले असून, समाजातील दुबळ्या घटकांना न्याय मिळवून देण्याची महत्त्वाची जबादारी हा विभाग उचलणार असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
आमदार जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी प्रदेश विधी कक्ष प्रमुख अॅड. अंजली आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा न्यायालयात कार्यरत असलेल्या विधीज्ञ युवक-युवतींनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. त्यांची विधी विभागाच्या सदस्यपदाचे नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी आमदार जगताप बोलत होते. याप्रसंगी अॅड. आव्हाड, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, कार्याध्यक्ष अभिजीत खोसे, कामगार सेलचे गजेंद्र भांडवलकर, विद्यार्थी सेलचे वैभव ढाकणे, सुमित कुलकर्णी, ज्ञानदेव पांडुळे आदी उपस्थित होते.
आ जगताप म्हणाले की, समाजातील सर्वच घटक वकील वर्गाशी जोडलेला आहे. पूर्वीपासूनच प्रत्येक कुटुंबाचे डॉक्टर व वकिलांशी घरगुती ऋणानुबंध असून, विविध निर्णयात त्यांचा सल्ला घेतला जातो. राष्ट्रवादीच्या विधी कक्षाच्या माध्यमातून आर्थिक परिस्थिती नसलेल्या नागरिकांना हा विभाग न्याय मिळवून देण्यासाठी आशेचा किरण ठरणार आहे.
राष्ट्रवादी प्रदेश विधी कक्षाच्या सदस्यपदी अॅड. प्रणाली चव्हाण, अॅड. गौरी सामलेटी, अॅड. रुपाली भोसले, अॅड. विरेंद्र शिंदे, अॅड. प्रदीप भोसले, अॅड. आसिफ शेख, अॅड. वरद शिंदे, अॅड. अमोल गरड, अॅड. शिवाजी शिंदे, अॅड. ज्ञानेश्वर करांडे, अॅड. योगेश धनवडे, अॅड. अक्षय काळे, अॅड. अतुल बरफे, अॅड. राहुल हिरनवाले, अॅड. अक्षय शिंदे, अॅड. दर्शन भिंगारदिवे, अॅड. अमोल अकोलकर, अॅड. विशाल पांडुळे, अॅड. संतोष तुपे, अॅड. राजेंद्र कानडे या वकीलांची नियुक्ती करण्यात आली.
COMMENTS