बीड / नगर सह्याद्री बीड येथे अजित पवार गटाची सभा झाली. या सभेनंतर अनेक विषय चर्चेत आलेले. यात जास्त चर्चेत आले ते मंत्री छगन भुजबळ यांचे भाष...
बीड येथे अजित पवार गटाची सभा झाली. या सभेनंतर अनेक विषय चर्चेत आलेले. यात जास्त चर्चेत आले ते मंत्री छगन भुजबळ यांचे भाषण. त्यांनी शरद पवार यांवर चांगलाच हल्लाबोल चढवला होता. परंतु यानंतर मात्र वादंग निर्माण झाले. मात्र यानंतर 'छगन भुजबळ यांचे भाषण मी ऐकलेच नाही,' असे अजब वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे.
तेलगी प्रकरणात आरोप झाल्यानंतर माझा राजीनामा घेतला गेला. मात्र, तुम्ही राजीनामा दिला नाही. दादा कोंडके यांच्यासारखे द्विआर्थी विनोद करू नका. भाजपसोबत सकाळचा शपथविधी हा कसला गुगली होता, अशी बोचरी टीका भुजबळ यांनी पवार यांच्यावर केली होती.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात भुजबळ यांच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. याकडे जेव्हा अजित पवारांचे लक्ष वेधले त्यावेळी अजित पवार म्हणाले की, 'समोरच्या लोकांना भाषण ऐकायला जाईल, अशी स्पीकरची रचना होती.
मी मागे बसल्याने ते भाषण मला ऐकू आले नाही,' अशी टिप्पणी करून त्यांनी नेहमीच्या शैलीत हसत हसत हा विषय टाळला. दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, यासंदर्भातल्या बातम्या मी नंतर वाचल्या. भावना दुखावल्या जाणार नाही,
याची काळजी घेऊन प्रत्येक नेत्याने योग्य भाषेत भूमिका मांडली पाहिजे. विचार वेगळे असले तरी भाषेची पातळी आणि सुसंस्कृत राजकारण कोणीही सोडू नये, असे सांगून अजितदादांनी वेळ मारून नेली.
COMMENTS