लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला रहावा; माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे संगमनेर| नगर सह्याद्री शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी काँग्रेस पक्षाकडून अनेक ...
लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला रहावा; माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे
संगमनेर| नगर सह्याद्री
शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी काँग्रेस पक्षाकडून अनेक उमेदवार इच्छुक आहे. याबाबत गटनेते आमदार बाळासाहेब थोरात यांचेही मत प्रामुख्याने विचारात घेतले जाणार असून काँग्रेस पक्षाला पोषक वातावरण असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री तथा काँग्रेस पक्षाचे निरीक्षक चंद्रकांत हंडोरे यांनी केले आहे.
संगमनेर येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी समवेत मतदार संघाचे आमदार लहू कानडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे, माजी नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे, -ाानेश्वर गायकवाड, करण ससाने, सौ उत्कर्ष रूपवते, हेमंत ओगले, सचिन गुंजाळ, डॉ. एकनाथ गोंदकर, सचिन गुजर, -ाानदेव वाफारे, राजेंद्र वाघमारे, अशोक कानडे, सोन्याबापू वाकचौरे मीनानाथ पांडे, सुरेश थोरात, तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. तांबे यांना सन्मानाने काँग्रेसमध्ये घ्या
माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांना पुन्हा काँग्रेस पक्षामध्ये संधी मिळावी अशी येथील कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यामुळे डॉ. तांबे यांना सन्मानाने काँग्रेसमध्ये घ्या असा ठराव आज जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत करण्यात आला. यावर निरीक्षक हांडोरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सदर मागणी प्रदेश काँग्रेसकडे कळवू असे आश्वासन दिले.
हांडोरे म्हणाले की, खोटी आश्वासने देऊन भाजप पक्ष सत्तेत आला असून काँग्रेसला बदलान केले जात आहे. उद्योग धार्जिणे धोरण राबवून भाजप जातीयवाद ,धर्मवाद प्रांतवाद यांच्या माध्यमातून राजकारण करून विरोधकांचा आवाज दाबण्याचे काम भाजप करत आहे. कोअर कमिटीच्या सूचनेनुसार महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघाच्या जागा चा आढावा घेण्यासाठी बैठका सुरू आहेत. यानुसार कोणत्या मतदारसंघात कोणत्या पक्षाचे प्राबल्य जास्त आहे. त्यानुसार जागांची विभागणी केली जाणार आहे. बैठकांमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती ,नगरपालिका ,स्थानिक स्वराय संस्था यांचाही आढावा घेतला जाणार आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाने लढवावा अशी कार्यकर्ते पदाधिकारी यांची मागणी आहे.
यावेळी आमदार लहू कानडे, राजेंद्र नागवडे, दुर्गाताई तांबे, करण ससाने, हेमंत ओगले, -ाानेश्वर गायकवाड, सौ.उत्कर्षा रुपवते, समन्वयक सचिन गुंजाळ, -ाानदेव वाफारे, डॉ. एकनाथ गोंदकर, सचिन गुजर, सौ अर्चनाताई बालवाडे, आकाश नागरे, पंकज लोंढे, मीनानाथ पांडे, तुषार पोटे आदी जणांनी आपली मनोगते व्यक्त केली.
यावेळी अजय फटांगरे, सौ सुनंदाताई जोर्वेकर, पद्माताई थोरात, बेबीताई थोरात, के.के थोरात, सुभाष सांगळे, सुधीर नवले, -ाानेश्वर मुरकुटे, निखिल पापडेजा ,गौरव डोंगरे, रमेश गफले आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानदेव वाफारे यांनी केले. सूत्रसंचालन मिलिंद कानवडे यांनी केले तर आभार सोमेश्वर दिवटे यांनी मानले. यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
COMMENTS