अहमदनगर । नगर सहयाद्री - गंगा उद्यान ते पंकज कॉलनी जाणार्या रस्त्यामध्ये वाढदिवस साजरा करून उच्छाद करणार्या टवाळखोर बड्डे बॉयसह मित्रांवर ...
अहमदनगर । नगर सहयाद्री -
गंगा उद्यान ते पंकज कॉलनी जाणार्या रस्त्यामध्ये वाढदिवस साजरा करून उच्छाद करणार्या टवाळखोर बड्डे बॉयसह मित्रांवर तोफखाना पोलिसांनी मंगळवारी (दि. ८) रात्री कारवाई केली.
गंगा उद्यान ते पंकज कॉलनी जाणार्या रस्त्यावर काही मुले वाढदिवस साजरा करून आरडा ओरडा करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना मिळाली होती. त्यांनी अधिकारी व अंमलदार यांच्यासह संबंधित ठिकाणी धाव घेतली. काही मुले रस्त्यावर वाहने आडवी लावून, आरडा ओरडा करत वाढदिवस साजरा करत असल्याचे दिसून आले. तसेच वाहतुकीस अडथळा होत असून पायी चालत येणार्या नागरिकांनाही त्रास होत असल्याचे दिसून आले. वाढदिवस साजरा करत असलेल्या मुलांना पोलीस आल्याचे दिसताच अनेकांनी धुम ठोकली.
बड्डे बॉय यश योगेश नरसिंगपूरकर (प्रेमदान हाडको, सावेडी), त्याचे मित्र आकर्ष गणेश दहिडे (रा. काळु बागवान गल्ली), तेजस नंदकिशोर चव्हाण (रा. प्रेमदान हाडको), अविष्कार अशोक कुलकर्णी (रा. ख्रिस्त गल्ली), रोहन प्रकाश वडवणीकर (रा. दत्तमंदिर समोर), अमित गणेश भिंगारे (रा. म्हाडा बिल्डींग), विशाल संजय आंबिलढगे (रा. पाईपलाईन रस्ता) यांना पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११०/११७ प्रमाणे कायदेशीर कार्यवाही केल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
COMMENTS