कोलकाता येथील महाविद्यालयाने विद्यार्थ्यांकडून घेतले प्रतिज्ञापत्र कोलकाता | वृत्तसंस्था येथील एका महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या प्रवेश अ...
कोलकाता येथील महाविद्यालयाने विद्यार्थ्यांकडून घेतले प्रतिज्ञापत्र
कोलकाता | वृत्तसंस्था
येथील एका महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या प्रवेश अर्जासोबतच त्यांच्याकडून पेहेरावासंदर्भात प्रतिज्ञापत्र घेतले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पेहेरावाची चर्चा ऐरणीवर येण्याची शयता आहे.
कोलकात्यातील आचार्य जगदीशचंद्र बोस महाविद्यालयाने हा नियम जारी केला आहे. प्रथम वर्ष अभ्यासक्रमास प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाबरोबरच हे लेखी आश्वासन लिहून देण्याचे निर्देश महाविद्यालयाने दिले आहेत. त्यामध्ये महाविद्यालयाच्या आवारात फाटया जीन्स घालण्यास सक्त मनाई असेल. फक्त फॉर्मल ड्रेस घालण्यास परवानगी असेल, असे नमूद केले आहे.
प्रवेशावेळी हे प्रतिज्ञापत्र महाविद्यालयाकडून देण्यात आले आहे. आचार्य जगदीशचंद्र बोस महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर मी कधीही महाविद्यालयाच्या आवारात फाटलेली किंवा तशी डिझाईन केलेली जीन्स घालणार नाही. आक्षेपार्ह कपडे परिधान करणार नाही. महाविद्यालयाच्या आवारात मी नियमानुसार परवानगी असणाराच पेहेराव करीन, असे प्रतिज्ञापत्र प्रवेश अर्जासोबत जोडणे बंधनकारक केले आहे.
महाविद्यालयाच्या या निर्णयाचे प्राचार्यांनी समर्थन केले आहे. गेल्या वर्षीही अशा मार्गदर्शक सूचना काढल्या पण, तरीही काही विद्यार्थी महाविद्यालयात फाटया जीन्स घालून येत असल्याचे दिसून आले होते. आमच्या विद्यार्थ्यांनी अशा पेहेरावात महाविद्यालयात यावे अशी आमची इच्छा नाही. मी त्याची परवानगी देणार नाही. महाविद्यालया बाहेर त्यांनी त्यांना हवे तसे कपडे घालावेत, असे प्राचार्य पूर्णा चंद्रा मैती यांनी सांगितले. असे निर्देश म्हणजे विद्यार्थ्यांच्या निवडीबाबतच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला ठरत नाहीत का, असे विचारले असता, महाविद्यालया बाहेर त्यांना ते स्वातंत्र्य नक्कीच असेल. पण महाविद्यालयाच्या आवारात त्यांना शिस्त व नियमांचे पालन करावे लागेल, असे प्राचार्य मैती यांनी स्पष्ट केले.
COMMENTS