स्वातंत्र्यसैनिक भि. मु. बोरा परिवाराचा सन्मान अहमदनगर | नगर सह्याद्री नगर जिल्ह्याला सहकारी चळवळीची मोठी परंपरा आहे. सहकारी बँकींग क्षेत्रा...
स्वातंत्र्यसैनिक भि. मु. बोरा परिवाराचा सन्मान
अहमदनगर | नगर सह्याद्री
नगर जिल्ह्याला सहकारी चळवळीची मोठी परंपरा आहे. सहकारी बँकींग क्षेत्रात सुवालालजी गुंदेचा यांनी अतुलनीय योगदान दिले. जैन ओसवाल पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी ही चळवळ आणखी व्यापक केली. त्यांचे व स्व. माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांचे अतिशय घनिष्ठ संबंध होते हे संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे. आज या पतसंस्थेची अतिशय सुसज्ज व दिमाखदार इमारत उभी आहे. विश्वासाहर्ता जपल्यामुळेच सहकारी संस्था प्रगती साधतात. या पतसंस्थेचे चेअरमन संतोष गांधी भाजपचे निष्ठावान आणि तत्वनिष्ठ कार्यकर्ते संतोष गांधी विराजमान असल्याने संस्था आणखी मोठी भरारी घेईल असा विश्वास खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला.
सहकार महर्षी सुवालालजी गुंदेचा जैन ओसवाल पतसंस्थेच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर नगरमधील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक स्व. भिकचंद मूळचंद बोरा (भि. मु. बोरा) यांच्या परिवाराला तिरंगा ध्वज देऊन गौरव केला व स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाबद्दल बोरा यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमास भि. मु. बोरा यांचे सुपुत्र प्रदीप बोरा, डॉ. रवींद्र बोरा, कन्या सुनिता अशोक गांधी, नातू डॉ. निलेश बोरा, राहुल अशोक गांधी, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष ड. अभय आगरकर, माजी अध्यक्ष भैय्या गंधे, ड. विवेक नाईक, धनंजय जाधव, सचिन पारखी, प्रमोद डागा , अभिजीत बोगावत, प्रशांत मुथा, गोपाल वर्मा, दामोदर भोसले, पतसंस्थेचे चेअरमन संतोष गांधी, व्हाईस चेअरमन समीर बोरा, संचालक अभय पितळे, शैलेश गांधी, चेतन भंडारी, विनीत बोरा, आनंद फिरोदिया, शरद गोयल, सौ.सुवर्णा डागा, सौ. प्रिती बोगावत, पंडितराव खरपुडे, विनय भांड, तज्ज्ञ संचालक शांतीलाल गुगळे, सी. ्ए. डॉ .परेश बोरा, सरव्यवस्थापक प्रशांत भंडारी आदी उपस्थित होते. यावेळी विखे परिवाराच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकारी, संचालकांचा खा. सुजय विखे पाटील यांनी सत्कार केला.
प्रास्ताविक प्रशांत भंडारी यांनी केले. चेअरमन संतोष गांधी म्हणाले की, सहकार महर्षी सुवालालजी गुंदेचा यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार संस्थेचा कारभार चालू आहे. संस्थेकडे आजमितीस ८५ कोटींच्या ठेवी असून ६६ कोटींचे कर्ज वितरण आहे. संस्थेच्या एकूण कर्जापैकी ४० टक्के कर्ज सुरक्षित सोनेतारण कर्ज आहे. संस्थेला सातत्याने ऑडिट अ वर्ग मिळत असून स्थापनेपासून सभासदांना १५ टक्के लाभांश दिला जातो.
खा. विखे यांनी पतसंस्थेत येऊन केलेले मार्गदर्शन संस्थेसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. स्वातंत्र्य दिन साजरा करतना ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बोरा यांच्या कुटुंबाचा सन्मान करतांना विशेष आनंद होत असल्याचे त्यांनी म्हटले. शेवटी व्हाईस चेअरमन समीर बोरा यांनी आभार मानले.
COMMENTS