चेंबूरमध्ये एका १५ वर्षीय मुलाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याच्यावर एका मुलीने वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार चेंबूरमध्ये घडला आहे.
मुंबई / नगर सह्याद्री -
मुंबईतील चेंबूर भागात शिक्षण घेण्याच्या वयात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. १५ वर्षीय मुलाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याच्यावर एका मुलीने वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार चेंबूरमध्ये घडला आहे. या प्रकरणी टिळक नगर पोलिस ठाण्यात २० वर्षीय मुलीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी मुलीला ताब्यात घेतले आहे.
या प्रकारामुळे भागात गोंधळ उडाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ वर्षीय पीडित मुलगा आणि २० वर्षीय आरोपी मुलगी एकाच भागात राहतात. काही दिवसांपूर्वी दोघांची ओळख झाली होती. यानंतर मुलीने अल्पवयीन मुलाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले.
एवढेच नाही तर त्याच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आले. महिनाभरापूर्वी मुलगा आणि मुलगी दोघेही बेपत्ता झाले होते. हा प्रकार मुलाच्या कुटुंबीयांना समजताच त्यांनी तत्काळ पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली. तेव्हापासून पोलिस दोघांचा शोध घेत होते.
पोलिसांनी दोघांचे मोबाईल लोकेशन तपासले असता ते चेन्नईत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार टिळकनगर पोलिसांचे पथक चेन्नईला रवाना झाले. तेथून पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. अल्पवयीन मुलाच्या पालकांच्या तक्रारीनुसार २० वर्षीय मुलीवर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
COMMENTS