श्रीगोंदा तालुक्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) च्या विद्यार्थ्यांचे श्रीगोंदा तहसील कार्यालयावर जनआक्रोश आंदोलन करण्यात आले.
श्रीगोंदा | नगर सह्याद्री
श्रीगोंदा तालुक्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) च्या विद्यार्थ्यांचे श्रीगोंदा तहसील कार्यालयावर जनआक्रोश आंदोलन करण्यात आले.
श्रीगोंदा तालुक्यात मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी एमपीएससीची तयारी करत आहेत. परंतु शासन आपले धोरण वारंवार बदलत असल्याने त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसतो. हे विद्यार्थी आपल्या आयुष्याची कित्येक वर्षे सरकारी नोकरी मिळवण्यासाठी घालवतात. ग्रामीण भागातून या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी शहरात येणार्या बहुतांश मुलांची घरची आर्थिक स्थिती बेताची असलेली दिसून येते.
मात्र शासन त्याची काही दखल घेत नाही. यावेळी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या विविध प्रकारच्या मागण्या आंदोलनामध्ये मांडण्यात आल्या. यावेळी महिला काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अनुराधा नागवडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून आंदोलन यशस्वी होण्यासाठी आयोगाकडे पाठपुरावा करण्याची तयारी दर्शवली. तसेच यावेळी बीआरएस पक्षाचे तालुका प्रतिनिधी टिळक बोस व प्रवीण शेलार यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. तसेच नेहमीप्रमाणे त्यांनी आक्रमक भूमिका घेऊन सरकार दरबारी या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत अशी मागणी त्यांनी यावेळी केली. जिल्हा अध्यक्ष युवक काँग्रेसचे स्मितल वाबळे यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला व मार्गदर्शन केले. तसेच वेळोवेळी विद्यार्थ्यांच्या हाकेला धावून येणारे श्रीगोंद्यातील सुपुत्र किरण निंभोरे यांनी वास्तव कट्ट्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच योगेश मांडे यांनी कार्यक्रमाचे संयोजन अतिशय उत्तम प्रकारे केले.
यावेळी राष्ट्रवादी तालुका युवक अध्यक्ष ऋषिकेश गायकवाड, माजी नगराध्यक्ष गयाबाई सुपेकर, सोशल मीडिया समन्वयक युवक काँग्रेस भूषण शेळके, विद्यार्थी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आदिल शेख, विद्यार्थी आंदोलक नितीन ढवळे, परशराम चव्हाण, अमोल मांडे, देवराम रायकर, आशीतोष जगताप, दादा शिंदे, पोपट जाधव, विकास मोहिते, दत्ता मांडे यांच्या सह मोठ्या संख्येने विध्यार्थी उपस्थित होते.
COMMENTS