निघोज | नगर सह्याद्री बालरोग तज्ञ डॉ. सुनील कदम यांनी गेली १९ वर्षें वैद्यकीय सेवेत कार्यरत असताना सेवाभाव केला म्हणून त्यांना विविध संस्थां...
निघोज | नगर सह्याद्री
बालरोग तज्ञ डॉ. सुनील कदम यांनी गेली १९ वर्षें वैद्यकीय सेवेत कार्यरत असताना सेवाभाव केला म्हणून त्यांना विविध संस्थांच्या माध्यमातून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. असे भाग्य फार थोड्या लोकांना मिळते, असे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँक व जी एस महानगर बँकेच्या संचालिका गीतांजली शेळके यांनी केले.
निघोज येथील वात्सल्य हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. सुनील कदम यांना लंडन येथील जागतिक संस्थेने बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार व मानांकन देऊन सन्मानित केल्याबद्दल त्यांचा जिल्हा सहकारी बँक, जी एस महानगर बँक व पिंपरी जलसेन ग्रामस्थांच्या वतीने शेळके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी जी एस महानगर बँकेचे उपाध्यक्ष भास्करराव कवाद, बाबासाहेब कवाद, निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत कवाद, ज्येष्ठ संचालक दामुशेठ लंके, बाबासाहेब कवाद, ग्रामविकास सेवाभावी संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश कवाद, जी एस महानगर बँकेचे सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी विलासराव ठुबे, मुंबई येथील व्यवसायिक विष्णूशेठ कदम, ठकुबाई कदम, मुंबई बँकेचे अधिकारी सुभाष खणकर, रुपाली कदम, अॅड. प्रियांका उदय शेळके, जी एस महानगर बँकेचे अधिकारी राहुल शेळके, पोपटराव लंके, निळकंठ सोनवणे, बाळासाहेब जगताप, किरण गायकवाड आदी उपस्थित होते.
यावेळी शेळके म्हणाल्या, मुंबई येथे व्यवसाय करताना विष्णूशेठ कदम यांनी जी एस महानगर बँकेचे संस्थापक अध्यक्ष सॉलिसिटर गुलाबराव शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक संस्कृतीला महत्व देऊन डॉ. कदम यांना उच्चशिक्षित केले. वडील विष्णूशेठ कदम, मातोश्री ठकुबाई कदम व त्यांच्या पत्नी रुपाली कदम यांनी डॉ कदम यांच्या या वैद्यकीय, सामाजिक कामात मोठे योगदान दिले.
मुंबई शहरात शिक्षण घेऊनही डॉ. कदम यांनी ग्रामीण भागात हॉस्पिटल सुरू करुन ग्रामीण भागातील जनतेच्या सेवेचे व्रत हाती घेतले. कोरोना काळात रुग्णांना मदत करुन वैद्यकीय सेवा दिली आहे. आज पुणे, मुंबई किंवा नगर अशा शहरांमधील उपचार जनतेला परवडत नाही. निघोज सारख्या ठिकाणी अत्याधुनिक सेवा व उपचार मिळणारे हॉस्पिटल उभे केले.
COMMENTS