सुपा | नगर सह्याद्री सोलापूर-पुणे महामार्गावर असलेल्या मोहोळजवळील यावली गावानजिक मालट्रक व कारच्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे....
सुपा | नगर सह्याद्री
सोलापूर-पुणे महामार्गावर असलेल्या मोहोळजवळील यावली गावानजिक मालट्रक व कारच्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. बुधवार दि. २३ रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. कारमधील सर्वजण तुळजापूरकडे देवदर्शनासाठी जात असताना हा भीषण अपघात झाला.
अपघातात पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशीद येथील चार जणांचा मृत्यू झाला आहे. आदमअली मुनावरअली शेख (वय ३७ ), हिराबाई रामदास पवार (वय ७५), कमलाबाई मारूती वेताळ (वय ६०) (सर्व राहणार रांजणगाव मशीद ता. पारनेर) या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. द्वारकाबाई नागनाथ गायकवाड (वय ४० रा. रांजणगाव मशीद) अपघातात जखमी झाल्या होत्या. त्यांना सोलापूरच्या ग्रामिण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.
दरम्यान रांजणगाव मशीद येथील भाविक देवदर्शनासाठी जात असताना काळाने घाला आतला. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. रात्री ९ वाजता रांजणगाव मशीद येथील अमरधाम मध्ये त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्दैवी घटनेने रांजणगावावर शोककळा पसरली आहे.
COMMENTS