छत्रपती संभाजीनगर / नगर सह्याद्री राजकीय घडामोडींना आता चांगलाच वेग आला आहे. INDIA च्या बैठकीनंतर आता विविध राजकीय वाद प्रतिवाद होताना दिसत...
छत्रपती संभाजीनगर / नगर सह्याद्री
राजकीय घडामोडींना आता चांगलाच वेग आला आहे. INDIA च्या बैठकीनंतर आता विविध राजकीय वाद प्रतिवाद होताना दिसत आहेत. आता पुन्हा एकदा राजकीय वाद समोर आला आहे. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आता राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांना मोठा टोला लगावला आहे.
आतापर्यंत शरद पवार कुठलीही चौकशी सुरू झाली तर यात राजकारण आहे असं म्हणायचे. परंतु कालच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसून सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना कुणाही बद्दल शंका असेल तर त्यांनी चौकशी करायला पाहिजे. त्यामुळे आता जेव्हा कधी चौकशी होईल तेव्हा रडायचं नाही.
आम्हाला त्रास दिला जातोय असं म्हणायचं नाही उलट आता चौकशीला सामोरे जाऊन उत्तरे द्यावत असा टोला मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवारांना लगावला आहे. टीका करताना मंत्री सुधीर मुनगंटीवर पुढे म्हणाले की, इंडिया आघाडीच्या बैठकीत जनतेच्या प्रश्नांवर काहीच चर्चा होणार नाही.
काही लोक म्हणतायेत की, मोदींच्या नरडीवर बसायचंय, पण ही मुंबई आहे, २०२४ च्या निवडणुकीत या सर्वांना तिरडीवर घेऊन लोकं जातील असा टोलाही लगावला.
COMMENTS