शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली आरोपींना घातला गंडा अहमदनगर | नगर सह्याद्री शेअर मार्केट ट्रेंडिगच्या नावाखाली तेरा कोटी ४९ लाखांची फसवण...
शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली आरोपींना घातला गंडा
अहमदनगर | नगर सह्याद्री
शेअर मार्केट ट्रेंडिगच्या नावाखाली तेरा कोटी ४९ लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार नगर शहरात समोर आला आहे. कंपनीतील गुंतवणुकीतून दर महिन्याला पाच टक्के परतावा देण्याच्या आमिषाने ही फसवणूक केली. ठगवलेल्यांनी पैसे परत करण्यास नकार देत गाशा गुंडाळल्याने तोफखाना पोलिस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला प्रियंका शैलेंद्र सुरपुरिया (वय ३६, रा. देना बँक कॉलनी, सावेडी रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे.
बाळासाहेब निवृत्ती काळे, भारती बाळासाहेब काळे व निहाल बाळासाहेब काळे (सर्व रा. रूपमाता नगर, सावेडी) या तीघांवर गुन्हा दाखल आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, प्रियंका शैलेंद्र सुरपुरिया व त्यांच्या सहकार्यांनी आरोपींना वेळोवेळी बँक खात्यावर व रोख स्वरूपात साडेतेरा कोटी रुपये दिले. शेअर मार्केट गुंतवणुकीसाठी इडलवाईज ब्रोकर इंडिया लिमिटेड कंपनीत गुंतवणूक केल्यास महिन्याला पाच टक्के परताव्याचे अमिष आरोपींनी दाखविले.
अमिषाला बळी पडत सुरपुरिया यांनी २०२१ ते ऑटोंबर २०२२ पर्यंत १३ कोटी ४९ लाख रुपयांची गुंतवणूक केली.
गुंतवणुकीनंतर पाच टक्के परताव्याची रक्कम काही महिन्यांनी देणे बंद केल्याने तक्रारदारांनी गुंतवलेली रक्कम परत मागितली. तेव्हा आमच्याकडे पैसे नाहीत, आम्ही डबघाईला आलो आहोत, असे सांगून गुंतवणुकीची रक्कम परत देण्यास नकार दिला. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक जुबेर मुजावर करीत आहेत.
COMMENTS