विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करत स्वातंत्रदिन साजरा पारनेर | नगर सह्याद्री भारतीय स्वातंत्र्य दिनाला सामाजिक बांधिलकीची जोड देत...
विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करत स्वातंत्रदिन साजरा
पारनेर | नगर सह्याद्री
भारतीय स्वातंत्र्य दिनाला सामाजिक बांधिलकीची जोड देत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर व त्यांच्या मित्रपरिवारांनी पारनेर शहरातील विद्यार्थ्यांना शालेय साहीत्य व खाऊ वाटप करत स्वातंत्रदिन साजरा केला. तर यापुढील काळात राजकारण विरहीत सोशल फौंडेशनची स्थापना करण्याची घोषणा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर यांनी केली आहे.
भारतीय स्वातंत्रदिनाचे औचित्य साधत पारनेर शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या मनात देश प्रेमाचे बीज रुजवीण्यासाठी व आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून सालाबाद प्रमाणे या ही वर्षी पारनेर शहरातील सामाजिक जाण असणारे सामाजिक चेहरे म्हणून ओळख निर्माण करणारे व त्या माध्यमातून लवकरच सर्व सामाजिक क्षेत्रात काम करणार्या मित्रांना बरोबर घेत, राजकारण विरहित सामाजिक प्रतिष्ठानची स्थापना करण्याचा माणस असणारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, बांधकाम सभापती नगरसेवक भुषण शेलार, राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेर शहर प्रमुख बंडू गायकवाड, अमित जाधव, उपशहर प्रमुख रमिज राजे, अॅड. गणेश कावरे, फहाद राजे, फिरोज राजे यांच्या सामाजीक योगदानातुन, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तसेच खाऊ वाटप करत स्वातंत्र्य दिन उत्साहात व आनोखा सामाजिक उपक्रम साजरा केला गेला.
पारनेर शहरातील देशाचे भविष्य आसनारे बाल विद्यार्थी आपल्या आयुष्याच्या बाराखडीची सुरुवात ज्या प्राथमीक शाळेतून करतात, त्या शाळेत शाळा खोल्या, शाळा सुशोभीकरण शौचालय व बाल विद्यार्थी मित्रांना स्वच्छतेसह निरोगी आयुष्य मिळावे म्हणून सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही प्रयत्नशील राहनार असुन सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून शाळेचे सुशोभीकरण करन्याचा प्रयत्न करत शाळेत अधुनिक शिक्षण प्रणालीचा अवलंभ करत सामान्य कुटुंबातील विद्यार्थी मित्रांना शैक्षणीक आवड निर्माण करण्यासाठी प्रयत्नशिल राहू असे यावेळी सामाजीक कार्यकर्ते भूषण शेलार, बंडू गायकवाड व अमित जाधव यांनी सांगीतले. यावेळी पारनेर नगरपंचायतचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्षा, सर्व समित्यांचे सभापती, सर्व नगरसेवक विवीध क्षेत्रातील मान्यवर मंडळी, पालक व शालेय साहित्य वाटपासाठी जमलेले विद्यार्थी यावेळी मोठ्या संखेने उपस्थित होते.
COMMENTS